कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘नाशिक रस्ता मध्यवर्ती कारागृहा’तील ५७ बंदीवानांची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका

नाशिक – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘नाशिक रस्ता मध्यवर्ती कारागृहा’तील छोट्या गुन्ह्यांतील ५७ बंदीवानांना वैयक्तिक जातमुचलक्यावर गेल्या ३ दिवसांत सोडण्यात आले. असे समजते की, कारागृहामध्ये मोठ्या गुन्ह्यांतील काही बंदीवानांनी कोरोनाचा अपलाभ घेत जामिनावर सोडण्यासाठी बंदीवानांना भडकवण्याचा प्रयत्न केला; मात्र कारागृह प्रशासनाने सर्व बंदीवानांची समजूत घातली. कारागृहातून जिल्हा रुग्णालय, अधिकोष, आस्थापने, विविध शासकीय कार्यालये यांना आतापर्यंत १५ सहस्र ‘मास्क’ बनवून देण्यात आले आहेत.