युद्धाची घोषणा करत रशियाचे युक्रेनवर आक्रमण

अन्य राष्ट्रांनी रशियाच्या या कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनी कधीही न अनुभवलेल्या परिणामांना त्यांना सामोरे जावे लागेल, अशी गर्भीत चेतावणीही पुतिन यांनी दिली.

संभाव्य युद्धस्थिती आणि भारत !

सध्या फुटीरतावाद्यांनी भारतात कधी नव्हता इतका कहर केला आहे. आतंकी, धर्मांध, नक्षली, बोडो, खलिस्तानी, ‘तुकडे गँग’, पुरोगामी आणि त्यांना साथ देणारे हिंदुविरोधी राजकीय पक्ष अन् प्रसारमाध्यमे यांच्यामुळे ‘युद्धकाळात अंतर्गत शांतता बिघडली’, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. भारतियांनी प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार करणे आवश्यक !

युक्रेन-रशिया वाद : रशियाची ‘फॉल्स फ्लॅग’ आक्रमणाची सिद्धता !

‘फॉल्स फ्लॅग’प्रमाणे रशिया असा कांगावा करील की, युक्रेनचे सैनिक त्याच्यावर आक्रमण करत आहेत. त्यामुळे तो आत्मरक्षणासाठी त्यांना प्रत्युत्तर देत आहे.’ म्हणजेच युक्रेनच्या सैनिकांनी आक्रमण केले; म्हणून रशिया युद्ध चालू करू शकतो !

जाणून घ्या – पुतिन यांनी ‘राष्ट्र’ म्हणून मान्यता दिलेल्या डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या प्रांतांविषयी !

रशियाचा घनिष्ठ मित्र असलेल्या बेलारूसमध्ये सध्या रशियाच्या काही तुकड्या युद्धसरावासाठी दाखल झाल्या आहेत. या तुकड्या सरावाची मुदत संपून गेल्यानंतरही बेलारूसमध्येच ठाण मांडून आहेत.

रशियाकडून युक्रेनमधील दोन प्रांतांना ‘स्वतंत्र राष्ट्र’ म्हणून मान्यता !

रशियाच्या या निर्णयामुळे जगभरात खळबळ ! रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाची शक्यता पहाता भारताने आतापासून पूर्ण सिद्धता केली पाहिजे, असेच जनतेला वाटते !

रशियासमर्थक फुटीरतावाद्यांच्या आक्रमणात युक्रेनचे २ सैनिक ठार ! – युक्रेनचा दावा

रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या सीमासंघर्षाने आता जणू युद्धाचे स्वरूप घेतले आहे. पूर्व युक्रेनमध्ये रशिया समर्थक फुटीरतावाद्यांनी केलेल्या आक्रमणामध्ये युक्रेनचे २ सैनिक ठार, तर ४ जण घायाळ झाले, असा दावा युक्रेनच्या सैन्याने केला आहे.

लडाख येथील सीमेविषयीच्या कराराचे चीनकडून उल्लंघन होत आहे ! – भारत

भारताने चीनला त्याला समजेल अशा भाषेत सुनावले पाहिजे !

रशियाकडून अमेरिकेच्या दूतावासातील उच्चाधिकार्‍याची हकालपट्टी

‘रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय सीमेसाठी कटीबद्ध असणारा भारत अमेरिकेला सहकार्य करील’.

रशियाने युक्रेनच्या सीमेवरून सैन्य परत बोलावले नसून उलट ७ सहस्र सैनिक वाढवले आहेत ! – अमेरिकेचा दावा

या दाव्याला ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख जिम हॉकेनहल यांनीही दुजोरा दिला आहे.

युक्रेन सीमेवरील काही सैन्य तुकड्या माघारी जात आहेत ! – रशियाची घोषणा

रशियाने त्यांच्या काही सैन्य तुकड्या माघारी घेण्याची घोषणा केली आहे; मात्र सीमाभागातील सैन्य जेव्हा ते मागे घेतील, त्याचवेळी तणाव न्यून करण्याच्या रशियाच्या प्रयत्नांवर विश्‍वास ठेवता येईल.