सातारा ‘जिल्हाबंदी’ करून प्रशासन शिवभक्तांचा गळा घोटत आहे ! – नितीन शिंदे, निमंत्रक, ‘श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन समिती’

प्रत्येक वर्षी प्रशासन आम्हाला जिल्हाबंदी घोषित करते. वास्तविक शिवभक्तांनी प्रतापगडावर शिवप्रतापदिन साजरा केला, तर प्रशासनाला अडचण होण्याचे कारण काय ?

जुने गोवे वारसास्थळाजवळील बांधकाम प्रकल्पाची अनुमती मागे घेण्याचे आदेश दिले आहेत ! – बाबू कवळेकर, उपमुख्यमंत्री

याचप्रमाणे सांकवाळ येथील वारसास्थळाजवळील ख्रिस्त्यांच्या अवैध बांधकामावरही शासन कारवाई करेल का ?

कोपरगाव येथील हिंदुत्वनिष्ठांच्या संघटितपणामुळे अनधिकृत पशूवधगृहावर कारवाई !

अनधिकृत पशूवधगृहावर कारवाई होण्यासाठी हिंदूंना आंदोलनाची चेतावणी का द्यावी लागते ? याचाच अर्थ प्रशासनाला अवैध बांधकामावर कारवाई करण्याची इच्छा नाही. अशा भ्रष्ट आणि कामचुकार प्रशासनावरच प्रथम कारवाई करायला हवी !

देवली आणि आंबेरी येथे वाळूच्या अवैध उपशाच्या विरोधात महसूल विभागाकडून १३ ‘रॅम्प’उद्ध्वस्त

देवली आणि आंबेरी येथे कर्ली नदीच्या पात्रात अवैधरित्या चालू असलेल्या वाळू उपशाच्या ठिकाणी महसूल विभागाच्या पथकाने धाड टाकली. या वेळी पथकाने येथे उभारण्यात आलेले १३ ‘रॅम्प’ उद्ध्वस्त केले.

शिरूर (जिल्हा पुणे) येथील अतिक्रमण करून बांधलेल्या धार्मिक स्थळांविरोधात तक्रारी करूनही प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !

अवैध अतिक्रमणांविरुद्ध तक्रारी देऊनही कारवाई होत नसेल, तर जनतेने कुणाकडे पहावे ? गेल्या ७ दशकांतील काँग्रेसने केलेल्या मुसलमानांच्या तुष्टीकरणाचेच हे फलित आहे !

नागपूर येथील गुन्हेगारीचा अड्डा असलेल्या ‘झिरो डिग्री बार’चे बांधकाम अवैध !

‘नागपूर सुधार प्रन्यास’कडून बांधकाम पाडण्यास टाळाटाळ ! शहरातील नागरिक, पोलीस आणि अधिवक्ते यांनी संघटित होऊन न्यायालयाद्वारे हा बार पाडण्याचा आदेश मिळवून तशी कारवाई केली पाहिजे.

पसार आरोपी देवानंद रोचकरींना मुंबईतील मंत्रालय भागातून अखेर अटक !

तीर्थक्षेत्र तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील मंकावती तीर्थकुंड येथे अवैधरित्या बांधकाम केल्याचे प्रकरण

पाटलीपुत्र (बिहार) येथील ४ मजली अवैध वक्फ भवन एका मासामध्ये पाडा ! – पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश

४ मजली इमारत अवैधपणे उभी रहात असतांना प्रशासन आणि पोलीस झोपले होते का ? वक्फ भवनाच्या ऐवजी हिंदूंचे एखादे धार्मिक भवन असे अवैधरित्या चुकून कुणी बांधले असते, तर प्रशासन मूकदर्शक बनून कधीतरी राहिले असते का ?

मुंबईमध्ये शासकीय भूमीवर २०० हून अधिक अवैध इमारती !

हा प्रकार अतिशय गंभीर असून अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम करणारे आणि त्याकडे दुर्लक्ष करणारे यांवर सरकारने कठोर कारवाई करावी !

अनधिकृत बांधकामे !

धर्माचरणी शासनकर्ते असल्यास अशा अवैध बांधकामांना प्रतिबंध करण्यासह असलेल्या अवैध बांधकामांवर कारवाई करण्याचा प्रयत्न कठोरपणे आणि तत्परतेने होऊ शकतो.