हिंदु धर्म सर्व मानवजातीला सामावून घेणारा ! – प.पू. ब्रह्मेशानंदस्वामी

हिंदु धर्मसंस्कृती रक्षणाचे कार्य करणार्‍या तपोभूमी गुरुपिठामुळे गोवा आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ‘शाहरूख खान यांना ओळखत नाही’ असे विधान केल्यावर खान यांच्याकडून मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना दूरभाष !

पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी अभिनेते शाहरूख खान यांचा आगामी ‘पठाण’ चित्रपट पहाण्यास स्पष्ट नकार दिला.

 कर्नाटकमधील भाजपचे आमदार जगदीश शेट्टर यांदा दावा कायदेशीर लढ्यासाठी गोवा कमकुवत !

समितीने प्रामाणिकपणे कार्य केल्यास गोव्याला न्याय मिळेल ! – राजेंद्र केरकर, पर्यावरणप्रेमी

मुंबईतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळावरून पिस्तुल आणि गोळ्या यांसह दोघांना अटक !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वांद्रे येथे सभा झाली. या वेळी पोलिसांनी सभास्थळावरून दोघाना अटक केली. त्यांच्याकडे प्राणघातक शस्त्रे पिस्तुलासह चार काडतुसेही सापडली आहेत.

उत्तरप्रदेशातील नोएडा आणि मथुरा येथे प्रशासनाला निवेदन सादर

२६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी राष्‍ट्रध्‍वजाचा मान राखला जावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने येथील शहर दंडाधिकारी कार्यालय आणि मथुरा येथील नगर अधिकारी सौरभ दुबे यांना निवेदन सादर करण्‍यात आले.

श्री भराडीदेवी (मालवण) आणि श्री देव कुणकेश्वर (देवगड) यात्रांच्या नियोजनाचा आराखडा सिद्ध करा ! 

४ फेब्रुवारी या दिवशी श्री भराडीदेवी आणि १८ फेब्रुवारी या दिवशी श्री देव कुणकेश्वर या देवतांच्या वार्षिक यात्रा होणार आहेत. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात १९ जानेवारी या दिवशी नियोजन आढावा बैठक झाली.

दीड कोटी व्यय (खर्च) करून निवडून आलो आहे !

सरपंच व्हायला दीड कोटी रुपये व्यय (खर्च) करावे लागत असतील, तर नगरसेवक, आमदार आणि खासदार व्हायला किती रुपये व्यय करावे लागत असतील, याची कल्पनाच करता येत नाही !

‘लव्ह जिहाद’विरोधी आणि ‘धर्मांतर बंदी’ कायदे त्वरित करा !

बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. या वेळी उपस्थित राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांनी ‘महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’विरोधी आणि ‘धर्मांतर बंदी’ हे कायदे त्वरित करावेत’, तसेच वक्फ कायदा रहित करावा, अशा मागण्या शासनाकडे केल्या.

आरोग्‍य विभाग २ कोटी ९२ लाख बालकांची पडताळणी करणार !

जिल्‍हा परिषद,  महानगरपालिका यांच्‍या शाळांसह खासगी शाळा, तसेच अंगणवाड्या यांतील बालकांची आरोग्‍य पडताळणी करण्‍यात येणार आहे.

‘शंकरवाडी’ हेच मेट्रो स्‍थानकाचे नाव कायम ठेवावे ! – आमदार रवींद्र वायकर

शंकरवाडी’ हे नाव अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. हे नाव पालटून ‘मोगरा विलेज’ केल्‍यामुळे स्‍थानिकांमध्‍ये असंतोष निर्माण होऊ शकतो. ‘शंकरवाडी’ हेच नाव ठेवण्‍यात यावे.