अमेरिकेत भारतियांचे कर भरण्यात भरीव योगदान!

भारतीय समाज उत्पादक आहे. हा समाज कुटुंबकेंद्रित आणि देशभक्त असतो. अशा लोकांसाठी स्थलांतर प्रक्रिया आणखी वेगवान आणि व्यवस्थित केली पाहिजे.-मॅक्कॉर्मिक

निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा निधी माघारी जाण्याची भीती !

निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत अधिकार्‍यांना धारेवर धरले.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना जिवे मारण्याची धमकी !

नागपूर पोलिसांसह आतंकवादविरोधी पथक, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि अन्य सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पाकमध्ये आतंकवाद्यांनी पोलीस ठाण्यावर केलेल्या आक्रमणात ३ पोलीस ठार

सरबंद पोलीस ठाण्यावर आतंकवादी लहान बाँब आणि ‘स्नायपर’ बंदुक घेऊन अचानक घुसले. गोळीबार करून सर्व आतंकवादी पळून गेले.

प्रार्थनास्थळे आणि कार्यक्रम यांतून ध्वनीप्रदूषण होणार नाही, याची दक्षता घ्या अन्यथा कारवाई ! – फुलचंद मेंगडे, पोलीस निरीक्षक, सावंतवाडी

सर्वधर्मियांनी ध्वनीक्षेपक वापरतांना त्याच्या आवाजाचा इतरांना त्याचा त्रास होणार नाही, तसेच याविषयी कोणतीही तक्रारी येणार नाही, याची काळजी घ्या.

हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि शिवभक्‍त यांच्‍या आक्रमक पवित्र्यामुळे विशाळगड अतिक्रमणाच्‍या संदर्भातील प्रशासकीय बैठक रहित !

बैठक म्‍हणजे एकप्रकारे अतिक्रमणकर्त्‍यांना पाठीशी घालण्‍याचा प्रयत्न होता. ही गोष्‍ट शिवभक्‍तांच्‍या लक्षात येताच या सर्वांनी मिळून प्रशासनास खडसावले. अखेर हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासानास बैठक रहित करण्‍याची नामुष्‍की ओढावली.

लाच घेणार्‍यांची पाठराखण का ?

देशातील भ्रष्‍टाचार संपवण्‍यासाठी प्रत्‍येकाने आपली मानसिकता पालटून ‘लाच घेणारा व्‍यक्‍ती आणि त्‍याचे कुटुंबीय यांनाच त्रास होईल’, असा विचार केल्‍यास प्रत्‍येक व्‍यक्‍ती कोणत्‍या ना कोणत्‍या कारणाने लाच घेण्‍यापासून लांब राहील, हे नक्‍की !

म्हादई पाणीतंट्यावर लवकरच उपाययोजना  करू ! – केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

डॉ. सावंत म्हणाले, ‘‘हा घाईघाईत सोडवण्याचा प्रश्न नाही. आम्हाला विश्वास आहे की, गोव्यावर अन्याय होणार नाही. आम्ही हा लढा जिंकू. ’’

गोव्यात आता ऑनलाईन पैसे भरून जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र मिळणार

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, ‘‘सरकारच्या या निर्णयामुळे नगरपालिका, गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इतर कार्यालये यांवरचा दबाव अल्प  होणार आहे.’’

देवतांची चित्रे काढण्याचा आदेश देणार्‍या शिक्षणाधिकार्‍यांना समज दिली आहे ! – गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री

धुळे जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी देसले यांनी ६ जानेवारी या दिवशी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये यांतील मुख्याध्यापकांना पत्र पाठवून शाळा-महाविद्यालये यांमध्ये सरस्वतीदेवीचे चित्र असल्यास ते काढण्याचा आदेश दिला होता.