आरोग्‍य विभाग २ कोटी ९२ लाख बालकांची पडताळणी करणार !

मुंबई – आरोग्‍य विभागाकडून राज्‍यातील १८ वर्षे वयोगटाखालील २ कोटी ९२ लाख बालकांची सर्वांगीण आरोग्‍य पडताळणी करण्‍यात येणार आहे. जिल्‍हा परिषद,  महानगरपालिका यांच्‍या शाळांसह खासगी शाळा, तसेच अंगणवाड्या यांतील बालकांची आरोग्‍य पडताळणी करण्‍यात येणार आहे. यासाठी राष्‍ट्रीय बाल स्‍वास्‍थ कार्यक्रमातील २ सहस्र ८२ यांसह आशा कार्यकर्त्‍या, अंगणवाडीसेविका यांद्वारे ही आरोग्‍य पडताळणी केली जाणार आहे.