सोलापूर येथे महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टिक मुक्ती अभियान

सोलापूर शहरातील विविध दुकानदारांनी प्लास्टिकच्या पिशवीचा उपयोग न करता कापडी पिशवीचा उपयोग करून पर्यावरणाचे रक्षण करावे.=उपायुक्त धनराज पांडे

राज्यशासनाच्या वतीने जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण खासगी आरोग्य सेवेतील डॉक्टर्स-कर्मचार्‍यांनी नोंदणी करावी ! -जिल्हाधिकारी दौलत देसाई

खासगी आरोग्य सेवतील सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी यांनी लसीकरणासाठी तालुका आरोग्य अधिकारी, शहर आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.

कोरोना लसीकरणाच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक घ्या ! – आमदार नीतेश राणे यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

देशात डिसेंबरअखेर कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्हास्तरावर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी भाजपचे आमदार नीतेश राणे केली आहे.

राज्यातील १४ सहस्र २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी या दिवशी मतदान

डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणार्‍या आणि नव्याने स्थापित होणार्‍या सर्व ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

मुंबईत ‘नाइट क्लब’च्या मालकांनी कोरोना नियमांचे पालन न केल्यास संचारबंदी ! -इक्बालसिंह चहल, आयुक्त, महापालिका

मौजमजा करण्याच्या नावाखाली नागरिक मोठ्या प्रमाणात नियम न पाळता एकत्रित आल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढेल.

(म्हणे) ‘केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना घरात घुसून चोप द्यावा लागेल !’

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी लोकप्रतिनिधीविषयी अशी भाषा वापरणे अशोभनीय !

शहापूर येथे १३ डिसेंबर या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन

शहापूर तालुका काँग्रेस कमिटी आणि डी. वाय. फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

वाहतुकीचा नियम चौथ्यांदा मोडल्यास ६ मासांसाठी अनुज्ञप्ती रहित होणार !

वाहतूक विभागाकडून ‘वाहनचालकांनी नियमांचे पालन कटाक्षाने करावे. रस्त्यावर पोलीस नाहीत, हे पाहून नियम मोडण्याचे धाडस करू नये’, असे आवाहन केले आहे.

आमदार अरुणअण्णा लाड यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ

पुणे पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अरुण अण्णा लाड यांनी विधानभवनात विधान परिषद सदस्यत्वासमवेत गोपनियतेची शपथ घेतली.

प्रभाग क्रमांक १६ मधील रेवणी रस्त्यावरील फायर स्टेशनच्या जागेवरच नवीन अत्याधुनिक फायर स्टेशन बांधा !

फायर स्टेशन आयुक्तांच्या आदेशाने स्टेशन चौक येथे स्थानांतरित करण्यात आले आहे. या जागेवर प्रशासन काय करणार आहे ?