शहापूर येथे १३ डिसेंबर या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन

ठाणे – राज्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार शहापूर तालुका काँग्रेस कमिटी आणि डी. वाय. फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने १३ डिसेंबर २०२० या दिवशी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शहापूर तालुक्यातील देशमुख वाडा भागात असलेल्या काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या जीवनदान महाअभियानाअंतर्गत हे रक्तदान शिबिर होणार असून रक्तदात्यांना आकर्षक सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. तालुक्यातील रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन डी.वाय. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हा नेते दयानंद चोरघे आणि शहापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेश धानके यांनी केले आहे.