नागपूर येथे जाब विचारला म्हणून गर्भवती महिलेला रुग्णालयाच्या प्रभागातून हाकलले !

गर्भवतीची वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात उघड्यावर प्रसूती !

वाराणसीमध्ये रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचारी यांना मारहाण : उपकरणांची तोडफोड

सध्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर आक्रमण होण्याचे प्रमाण वाढले आहे. हे रोखण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक !

पिंपरी (पुणे) येथील ‘वाय.सी.एम्.’ रुग्णालयात मृतदेहाची अदलाबदल, एकाच मृतदेहावर २ वेळा अंत्यसंस्कार !

 नातेवाइकांच्या भावनांचा विचार न करणार्‍या असंवेदनशील अधिकार्‍यांना कठोर शिक्षाच हवी !

संभाजीनगर जिल्हा रुग्णालयात पालकमंत्र्यांकडून विद्युत् जनित्राच्या प्रस्तावाला मान्यता !

लोकप्रतिनिधींनी रुग्णालयांतील सर्व समस्या सोडवून नवीन सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी जनतेची अपेक्षा !

सतना (मध्यप्रदेश) येथील सरकारी रुग्णालयातील डॉक्टरने औषधाच्या ‘प्रिस्क्रिप्शन’वर ‘श्री हरि’ लिहिण्यास केला प्रारंभ !

सतना येथील सकारी रुग्णालयातील डॉक्टरनेऔषधाच्या चिठ्ठीमध्ये ‘श्री हरि’ लिहिण्यास प्रारंभ केला आहे. डॉ. सर्वेश सिंह असे ते लिहिणार्‍यांचे नाव आहे.

दौंड (जिल्हा पुणे) येथील उपजिल्हा रुग्णालयातील शिपाई आणि अधीक्षक यांना लाच घेतांना अटक !

दुबार विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांच्यासह शिपाई खोत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली.

भिवंडी तालुक्यात वीज कोसळून २ ठार, तर २ जण घायाळ !

भिवंडी तालुक्यातील पिसे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील चिराडपाडा या आदिवासी वस्तीत १४ ऑक्टोबर या दिवशी पडलेल्या पावसाच्या वेळी वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत शीतल वाघे (वय १७ वर्षे) आणि योगिता वाघे (वय २० वर्षे) या दोघींचा मृत्यू झाला आहे.

रात्रीच्या वेळी डॉक्टर रुग्णालयात उपस्थित नसल्यास त्यांना थेट निलंबित करणार ! – तुकाराम मुंढे, आयुक्त

राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे रात्रीच्या वेळी आरोग्य विभागातील अधिकार्‍यांनी धाडसत्र कारवाई चालू केली आहे. पुणे जिल्ह्यातील आळंदी, वाघोली येथील ग्रामीण रुग्णालयांत तपासणी करण्यात आली.

डॉ. निखिल सैंदाणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार !

नाशिक जिल्हा रुग्णालयातील बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी केंद्रीय आरोग्य सचिवांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील तत्कालीन अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने ६ ऑक्टोबर या दिवशी राखून ठेवला.

कराचीमध्ये दातांच्या चिकित्सालयातील गोळीबारात १ चिनी ठार, तर ३ चिनी नागरिक घायाळ !

कराची येथे दाताच्या चिकित्सालयात एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात चिनी नागरिकाचा मृत्यू झाला, तर अन्य ३ चिनी नागरिक गंभीररित्या घायाळ झाले. या घटनेचे दायित्व अद्याप कोणत्याही आतंकवादी संघटनेने स्वीकारलेले नाही.