नायगाव (जिल्हा पालघर) येथील कारखान्यातील स्फोटात ३ कामगार ठार !

नायगाव पूर्व भागातील जुचंद्र वाकीपाडा येथील ‘कॉस पॉवर’ या कारखान्यात २८ सप्टेंबर या दिवशी दुपारी पावणेतीन वाजता बॉयलरचा स्फोट झाला. यात ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर ७ जण गंभीर घायाळ झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

भिवंडी येथे संरक्षक भिंत पडून ६ जण घायाळ !

भिवंडी शहरातील चव्हाण वसाहतीच्या परिसरात एका मंगल कार्यालयाची धोकादायक संरक्षक भिंत जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात येत होती. भिंत शेजार्‍यांच्या घरावर कोसळल्याने ६ जण घायाळ झाले आहेत.

जीवघेण्या ‘हिमोफिलिया’ आजारावरील औषधांच्या खरेदीकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष !

इंजेक्शनअभावी होणारा रक्तप्रवाह रुग्णांसाठी जीवघेणा !

नाशिक येथील बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रप्रकरणी २१ पोलिसांवर गुन्हा नोंद !

या पोलीस कर्मचार्‍यांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी २१ सप्टेंबर या दिवशी दिली.

रुग्णांच्या आरोग्य सेवेसमवेत स्वच्छतेला महत्त्व द्या !

या वेळी आरोग्यमंत्री म्हणाले की, प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता ठेवावी. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक पातळीवर निविदा काढून स्वच्छतेसाठी दोन व्यक्ती नेमण्याचे निर्देश श्री. सावंत यांनी दिले.

धरणीचा पाडा (भिवंडी) येथे झोळीतून गरोदर महिलेला नेतांना बाळ दगावले

तालुक्यातील धरणीचा पाडा येथील भागात रस्ते नसल्याने गरोदर महिलेला मुख्य रस्त्यावर नेतांना त्या महिलेची प्रसूती झाली आणि तिचे बाळ दगावले. रस्ते नसल्याने या महिलेला ५ ते ६ गावकरी चादरीची झोळी करून नेत होते.

पोर्तुगालमध्ये गर्भवती भारतीय महिलेला वेळीच उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू

पोर्तुगालमध्ये एका भारतीय महिलेल्या मृत्यूनंतर पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री मार्टा टेमिडो यांनी मंत्रीपदाचे त्यागपत्र दिले आहे.

रुग्णांच्या समस्या सोडवण्यासाठी रुग्णालय सल्लागार समिती गठीत करणार ! – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘मुंबईतील रुग्णालयांत रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना बसण्याची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता यांविषयीच्या समस्या  सोडवण्यासाठी सल्लागार समिती कार्य करेल.”

पुणे येथील ‘ससून’च्या अधिष्ठात्यांनी मारहाण केल्याचा आधुनिक वैद्यांचा आरोप !

येथील ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये साहाय्यक प्राध्यापक हृदयशस्त्रक्रिया विभाग या पदासाठी काही मासांपूर्वी आधुनिक वैद्य ज्ञानेश्वर बोराडे यांनी मुलाखत दिली होती. त्याविषयी चौकशी करण्यासाठी गेलेल्या बोराडे यांना मुख्य प्रशासकीय अधिकार्‍यांनी मारहाण केली.

नागपूर येथे रुग्णाच्या मृत्यूमुळे नातेवाइकांकडून किमया रुग्णालयात तोडफोड !

शहरातील किमया रुग्णालयात उपचारांच्या वेळी एका रुग्णाचा मृत्यू झाला. ‘आधुनिक वैद्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे’, असा आरोप करत रुग्णाच्या नातेवाइकांनी १९ ऑगस्ट या दिवशी रुग्णालयात तोडफोड केली.