हरियाणाच्या रुग्णालयांमधील कर्मचार्यांसाठी नियमावली घोषित !
चंडीगड – हरियाणा सरकारच्या आरोग्य विभागाने वेशभूषेविषयी नियमावली घोषित केली आहे. त्याद्वारे रुग्णालयांमधील कर्मचार्यांना जीन्स, प्लाझो, बॅकलेस टॉप, स्कर्ट यांसारखे फॅशनेबल कपडे घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच पुरुष कर्मचार्यांचे केस कॉलरपेक्षा लांब नसतील, याची दक्षताही त्यांना घेण्यास सांगण्यात आले आहे.
हरियाणा के सरकारी अस्पतालों में ड्रेस कोड लागू, पुरुषों के जींस, टीशर्ट, और महिलाओं के स्कर्ट और शॉर्ट्स पर बैन https://t.co/QYXT3Sr9A3
— ETVBharat Haryana (@ETVBharatHR) February 10, 2023
महिला कर्मचार्यांना जड दागिने घालण्यावर, मेकअप करण्यावर आणि नखे वाढवण्यावर निर्बंध घालण्यात येणार आहे. या नियमांचे पालन न करणार्या कर्मचार्यांवर कर्तव्यावर अनुपस्थित मानून कारवाई करण्यात येणार आहे.