नागपूर येथे घरासमोरील वाहनतळावरून झालेल्‍या वादातून तरुणाचा खून !

कायदा-सुव्‍यवस्‍थेचा धाक नसल्‍याचे लक्षण !

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर – घरासमोर मॅक्‍सी वाहन ठेवण्‍याच्‍या कारणामुळे २ गटांत झालेल्‍या वादातून हाणामारी झाली. यामध्‍ये योगेश धामने (वय १८ वर्षे) या तरुणाचा मृत्‍यू झाला. या प्रकरणी रामभाऊ शाहू आणि मोनू रायतदार (वय २२ वर्षे) घायाळ झाले असून त्‍यांच्‍यावर रुग्‍णालयात उपचार चालू आहेत. ही घटना १९ जानेवारीच्‍या रात्री घडली. मोनू बन्‍सीलाल रायतदार (वय २२ वर्षे), सुदामा बन्‍सीलाल रायतदार (वय २४ वर्षे) आणि नंदलाल रायतदार अशी आरोपींची नावे आहेत.

रामभाऊ शाहू आणि योगेश धामने यांचा २ दिवसांपूर्वी मोनू रायतदार, सुदामा अन् त्‍यांचे काका नंदनलाल रायतदार यांच्‍यात वाहनतळावरून वाद झाला होता. झालेल्‍या भांडणात त्‍यांनी एकमेकांना बघून घेण्‍याची धमकी दिली होती. घटनेच्‍या दिवशी योगेश रामभाऊ शाहू यांच्‍या घरी आला. ते दोघेही बाहेर उभे असतांना मोनू आणि योगेश यांच्‍यात पुन्‍हा वाद झाला. त्‍यातून रामभाऊ यांनी मोनूला मारहाण चालू केली. त्‍यामुळे घरातून नंदलाल आणि सुदामा यांनी शस्‍त्रांनी योगेश आणि रामभाऊ यांना मारहाण केल्‍यावर योगेश याचा जागीच मृत्‍यू झाला.