गंगेची वाडी (पेण) येथे धर्मांतर करण्यासाठी आलेल्या ख्रिस्ती धर्मप्रसारकांना हिंदुत्वनिष्ठांनी रोखले !

हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी आलेल्या ख्रिस्त्यांवर गुन्हे नोंद होणारे कडक कायदे हवेत !

हिंदूंची संपत्ती हडपण्याचे अमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्फ कायदा’ रहित करा ! – चंदगड येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात हिंदूंची एकमुखी मागणी

देशभरात वक्फ कायद्याच्या दुरुपयोगाने चालू असलेला ‘लँड जिहाद’च आहे. हा धार्मिक भेदाभेद करणारा, राज्यघटनाविरोधी काळा कायदा त्वरित रहित करण्यात यावा, या मागणीसाठी चंदगड येथे छत्रपती संभाजी महाराज चौक येथे ३१ ऑक्टोबरला हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.

हलाल प्रमाणपत्र व्यवस्था तात्काळ बंद करावी !

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र व्यवस्था’ तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांचे अन्वेषण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. असेच निवेदन मंचर येथेही देण्यात आले.

केजरीवाल यांना हिंदुत्वाविषयी प्रेम असेल, तर हिंदु राष्ट्राची मागणी करावी ! – राष्ट्रीय हिंदु संघटनेची मागणी

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर भगवान श्री गणेश आणि श्री लक्ष्मी यांचे चित्र लावण्याची मागणी केली आहे. त्याला येथील ‘राष्ट्रीय हिंदु संघटने’ने विरोध केला आहे.

श्रीमंतयोगी प्रतिष्ठानच्या वतीने वाडा येथील आदिवासी भागांत फराळ आणि फटाके यांचे वाटप

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित झालेले श्रीमंतयोगी प्रतिष्ठान आज मोठ्या संख्येने युवकांना एकत्र करून सामजिक क्षेत्रात कार्य करत आहे. संघटना बरेच विषय हाताळून हिंदु धर्म कसा अबाधित राहील, या दृष्टीने प्रयत्न करत आहे.

 फेसबुकवर ‘कट्टर हिंदु’ असे लिहिल्याने धर्मांध मुसलमानांकडून हिंदु तरुणाला मारहाण

भारतात हिंदूंना ते हिंदु असल्याचेही लिहिण्यावरून मारहाण केली जाते, हे बहुसंख्य हिंदूंना लज्जास्पद !

हिंदु राष्ट्र करण्याच्या मागणीसाठी मोठे आंदोलन उभे करणे आवश्यक ! – विश्वनाथ कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती

राज्यघटनेत दुरुस्ती करून भारताला ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ करता येऊ शकते. त्याप्रमाणे घटनेत सुधारणा करून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित का करता येऊ शकत नाही ? भारताला परत हिंदु राष्ट्र करण्यासाठी एक मोठे आंदोलन उभे करण्याची आवश्यकता आहे.

हलाल सक्तीच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांचे ठाणे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

भारतात हलालच्या माध्यमातून समांतर इस्लामी अर्थव्यवस्था उभी करण्याचे कारस्थान रचले जात आहे. त्याविरोधात हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटना यांनी हलाल सक्तीच्या विरोधात अभियान आरंभले आहे.

दीपावलीत हलाल प्रमाणित वस्तूंवर बहिष्कार घालून हिंदु धर्माचा सन्मान करा ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘हलालमुक्त दीपावली’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

देवता-राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले आणि चिनी फटाके यांच्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची हिंदुत्वनिष्ठांची मागणी !

देवता-राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाके विक्रेत्यांवर कारवाई करावी, तसेच चिनी बनावटीच्या फटाक्यांची विक्री करणार्‍यांवर तात्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी शिरोली पुलाची येथे साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील यांना दिले.