फेसबुकवर ‘कट्टर हिंदु’ असे लिहिल्याने धर्मांध मुसलमानांकडून हिंदु तरुणाला मारहाण

ठार मारण्याची धमकी !

फर्रुखाबाद (उत्तरप्रदेश) – येथे मोहित चौहान या तरुणाने फेसबुकवर स्वतःला ‘कट्टर हिंदु’ असे लिहिल्यावरून धर्मांध मुसलमानांच्या जमावाने त्यांना आणि त्यांच्या मित्रांना मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. तक्रारीमध्ये बिलाल अली, सरताज, रेहान, आमिर, नूर मोहमंद आदींची नावे देण्यात आली आहेत. या वेळी हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर निदर्शनेही केली. पोलीस या मारहाणीच्या घटनेची चौकशी करत आहेत.

मोहित चौहान त्यांच्या मित्रांसह सायंकाळी अल्पाहार करण्यासाठी बाहेर गेले असता तेथे धर्मांध मुसलमानांचा जमाव आला आणि त्यांनी चौहान यांना फेसबुकवरून ‘कट्टर हिंदु’ असे लिहिलेले हटवण्यास सांगितले. ‘तसे न केल्यास या भागात राहू देणार नाही’, अशी धमकी देत शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी चौहान यांना मारहाण करत ठार मारण्याचीही धमकी दिली. मारहाण करणार्‍यांचा ‘इस्टाग्रा’मवर ‘डेविल ग्रुप ३०२’शी संबंध आहे. ते याच्यावर शस्त्रे हातात घेतलेली छायाचित्रे प्रसारित करत असतात.

संपादकीय भूमिका

  • भारतात हिंदूंना ते हिंदु असल्याचेही लिहिण्यावरून मारहाण केली जाते, हे बहुसंख्य हिंदूंना लज्जास्पद !
  • उत्तरप्रदेशमध्य भाजपचे सरकार असतांना हिंदूंना अशा प्रकारे मारहाण केली जाते, हे हिंदूंना अपेक्षित नाही !