ठाणे, २४ ऑक्टोबर (वार्ता.) – भारतात हलालच्या माध्यमातून समांतर इस्लामी अर्थव्यवस्था उभी करण्याचे कारस्थान रचले जात आहे. त्याविरोधात हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटना यांनी हलाल सक्तीच्या विरोधात अभियान आरंभले आहे. या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यासाठीचे निवेदन ठाणे जिल्हाधिकार्यांना येथील हिंदुत्वनिष्ठांकडून देण्यात आले. हे निवेदन जिल्हाधिकार्यांच्या अनुपस्थितीत तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांनी स्वीकारले. त्यांनी हलाल प्रमाणपत्र आणि हलाल अर्थव्यवस्था हा विषय समजून घेतला अन् ‘हे निवेदन लवकरात लवकर पंतप्रधान कार्यालयाला पाठवतो’, असे सांगितले. त्या वेळी सर्वश्री सुनील धामणकर, शंकर विश्वकर्मा, हिंदु जनजागृती समितीचे सुनील कदम आणि अधिवक्ता शुभम् देसाई उपस्थित होते.