ठाणे, २७ ऑक्टोबर (वार्ता.) – सामजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरा जोपासण्यासाठी, तसेच हिंदूंचे संघटन करण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्ह्यातील दिवा येथील श्रीमंतयोगी प्रतिष्ठान कार्य करते. प्रतिष्ठानच्या वतीने वाडा तालुक्यातील अंबाडी फाटा येथील आदिवासी पाड्यांमध्ये ‘एक पणती घरोघरी’ या उपक्रमांतर्गत फराळ आणि फटाके यांचे वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित झालेले श्रीमंतयोगी प्रतिष्ठान आज मोठ्या संख्येने युवकांना एकत्र करून सामजिक क्षेत्रात कार्य करत आहे. संघटना बरेच विषय हाताळून हिंदु धर्म कसा अबाधित राहील, या दृष्टीने प्रयत्न करत आहे.
संघटनेचे आधारस्तंभ सर्वश्री शशिकांत पाटील, अध्यक्ष अरविंद उभारे यांच्या मार्गदर्शनानुसार उपाध्यक्ष अजय चव्हाण, खजिनदार संकेश भावे यांच्यासह संकेत चव्हाण, सुधाकर हर्णेकर, अनिल करकरे, दिनेश सावंत, दत्ताराम कोशिमकर, संभाजी कणसे, कृष्णा चौगुले, ऋषी सुर्वे, सागर वालिकर, रूपेश दुखंडे, अरविंद घोगळ, महेश साटम, सुनील तुरे, किशोर गुरव, बलराज शिंदे, रोहिदास काठे, मंगेश लाड, रवी शेजवळ आणि इतर पदाधिकारी या फराळ वाटपाच्या उपक्रमात सहभागी झाले होते.