केजरीवाल यांना हिंदुत्वाविषयी प्रेम असेल, तर हिंदु राष्ट्राची मागणी करावी ! – राष्ट्रीय हिंदु संघटनेची मागणी

राष्ट्रीय हिंदु संघटनेचे अध्यक्ष सतेंद्र दुबे

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर भगवान श्री गणेश आणि श्री लक्ष्मी यांचे चित्र लावण्याची मागणी केली आहे. त्याला येथील ‘राष्ट्रीय हिंदु संघटने’ने विरोध केला आहे.

राष्ट्रीय हिंदु संघटनेचे अध्यक्ष सतेंद्र दुबे यांनी म्हटले की, केजरीवाल यांनी अशी मागणी करून सनातन संस्कृती आणि हिंदू यांचा अपमान केला आहे. अशा नोटा मद्याच्या दुकानावर जातील, ते आम्ही सहन करू शकत नाही. जर केजरीवाल यांना हिंदुत्वाविषयी इतकेच प्रेम असेल, तर त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याची मागणी करण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे. जर ते असे पाऊल उचलतील, तर त्यांचे स्वागत केले जाईल आणि भारतातील १०० कोटी हिंदु त्यांच्या मागे रहातील.