दीपावलीत हलाल प्रमाणित वस्तूंवर बहिष्कार घालून हिंदु धर्माचा सन्मान करा ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘हलालमुक्त दीपावली’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

श्री. आनंद जाखोटिया

मुंबई – हलाल प्रमाणपत्राद्वारे जमा झालेला पैसा देशाच्या विकासासाठी न जाता इस्लामी मान्यतांना प्रोत्साहन देण्यासाठी वापरला जात आहे, तसेच हा पैसा ‘जमियत उलेमा-ए-हिंद’सारख्या संघटनांच्या माध्यमांतून आतंकवादी कारवायांसाठी देशाच्या विरोधातही वापरला जात आहे. देशातील हिंदूंच्या आणि भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विरोधातील षड्यंत्र आहे. दीपावलीच्या पर्वात हलाल प्रमाणित वस्तूंवर बहिष्कार घालून हिंदु धर्माचा सन्मान करा. आम्ही देशभर ‘हलालमुक्त दीपावली’ हे अभियान राबवत असून हिंदूंनी त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘हलालमुक्त दीपावली’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

हिंदूंनी हलाल प्रमाणपत्र नसलेल्या वस्तू खरेदी कराव्यात ! – सुरेश जैन, अध्यक्ष, अखिल भारत हिंदु महासभा

श्री. सुरेश जैन

‘हलाल प्रमाणपत्राद्वारे विविध आतंकवादी संघटनांना अर्थपुरवठा केला जात आहे. हिंदु व्यापार्‍यांनी आतंकवाद्यांना पैसे पुरवणार्‍या या हलाल प्रमाणपत्राचा उपयोग करणे थांबवले पाहिजे आणि आपल्या देशाच्या अधिकृत संस्थांकडूनच प्रमाणपत्र घेऊन व्यापार करावा. हलाल प्रमाणपत्र असलेल्या जीवनावश्यक वस्तूंवर हिंदूंनी बहिष्कार घातल्यास ते क्रांतीच्या स्वरूपात कार्य करील. हिंदूंनी हलाल प्रमाणपत्र नसलेल्या वस्तू खरेदी कराव्यात.’