गुरुपौर्णिमेच्या कालावधीत जालगाव (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. शांताराम मांडवकर यांच्या घरी झालेले विविध त्रास

‘सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी प्रतिवर्षी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन केले जाते. ‘साधकांना गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासह समष्टी साधना करण्याची संधी मिळावी आणि याद्वारे समाजाची सात्त्विकता वाढावी’, या हेतूने हा महोत्सव साजरा केला जातो; मात्र ‘समाजाची सात्त्विकता वाढू नये, तसेच साधकांनीही साधनेपासून परावृत्त व्हावे’, यांसाठी सूक्ष्मातील वाईट शक्ती साधक आणि त्यांच्या वस्तू यांवर सातत्याने आक्रमणे करतात. गुरुपौर्णिमेच्या कालवधीत जालगाव, दापोली येथील श्री. शांताराम मांडवकर यांच्या घरी वाईट शक्तींच्या आक्रमणांमुळे झालेले विविध त्रास येथे दिले आहेत.

– सौ. शारदा मांडवकर आणि श्री. शांताराम मांडवकर, जालगाव, दापोली, जिल्हा रत्नागिरी. (२०.७.२०२४)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.