सनातन संस्थेच्या वतीने ठाणे जिल्ह्यात ६ ठिकाणी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी !

जिल्ह्यातील ठाणे, डोंबिवली आणि बदलापूर येथे एकूण ६ ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यांचा लाभ ७२५ हून अधिक साधक आणि जिज्ञासू यांनी घेतला.

शाळेत गुरुपौर्णिमा साजरी करतांना शिक्षकांनी गुरूंचे महत्त्व मुलांना सांगणे अपेक्षित !

मातेला मान देण्याला महत्त्व आहे, याविषयी शंका नाही; परंतु गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता आणि गुरु यांच्या भूमिकेत गल्लत करू नये.

सध्याच्या काळात हिदूंना संघटित करून दबावतंत्राचा वापर केला पाहिजे ! – भगवंत जांभळे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष, मनसे

‘लव्ह जिहाद’ प्रकरणी हिंदूंनी पीडित हिंदु तरुणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून रोखठोक भूमिका घेतली पाहिजे, तसेच हिंदूंना संघटित करून त्याद्वारे दबावतंत्राचा वापर केला पाहिजे, असे परखड मत मनसेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री. भगवंत जांभळे यांनी येथे व्यक्त केले.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अधिकाधिक साधना करण्याचा संकल्प करूया ! – डॉ. (सौ.) सायली यादव, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

सर्वोच्च आनंद केवळ साधना करूनच मिळू शकतो. यासाठी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अधिकाधिक साधना करण्याचा संकल्प करा, असे आवाहन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या डॉ. (सौ.) सायली यादव यांनी केले.

आनंदप्राप्ती आणि रामराज्याची स्थापना यांसाठी साधना !

रामराज्य येण्यापूर्वी  रावणवध होणे विधीलिखित होते. रावणवधानंतरच रामराज्याची स्थापना झाली. आताही रामराज्यरूपी हिंदु राष्ट्र येण्यापूर्वी आपत्काळ येणे अटळ आहे, किंबहुना त्याचा आरंभही झाला आहे.

पनवेल येथे सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा !

खांदा वसाहतीतील सोहळ्यात हिंदुत्वनिष्ठ कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त जोशी यांनी मार्गदर्शन करतांना राष्ट्र-धर्म म्हणजे काय, राष्ट्र आणि धर्म यांच्याप्रती आपली कर्तव्ये कोणती आणि त्यांचे पालन कसे करावे, यावर मार्गदर्शन केले.

मुंबई, नवी मुंबई येथे अनेक जिज्ञासूंनी घेतला सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमेचा लाभ ! 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाने हिंदु राष्ट्र स्थापनेचा मार्ग सुलभ होईल ! – अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, मुंबई उच्च न्यायालय मुंबई, २२ जुलै (वार्ता.) – सनातन संस्थेच्या वतीने माहीम, विलेपार्ले आणि खारघर या ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव पार पडला. तीनही ठिकाणी ५०० हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते. माहीम येथे उच्च न्यायालयाचे अधिवक्ता घनश्याम उपाध्याय आणि हिंदु … Read more

कोल्हापूर शहरातील गुरुपौर्णिमेसाठी ६०० जणांची उपस्थिती !

महाराष्ट्रातील प्रत्येक गड-दुर्गांवरील अतिक्रमण हे निघालेच पाहिजे आणि त्यासाठी गेली अनेक वर्षे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे लोक आंदोलन करत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव  भावपूर्ण वातावरणात साजरा

दिवसभर संततधार पाऊस पडत असतांनाही राजापूर तालुक्यातील भू, पेंडखळे, पाचल, तसेच लांजा तालुक्यातूनही जिज्ञासू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काल २१ जुलै २०२४ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा झाली. त्या निमित्ताने…

जगातील सर्वश्रेष्ठ, मंगल, उदात्त, दिव्य आणि भव्य जे जे आहे, ते ते देणारे एकमेव असलेले तेच सद्गुरु; म्हणून तेच सर्वश्रेष्ठ दैवत नव्हे का ?