संभाजीनगर येथे १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पोलीस उपनिरीक्षकास अटक !

भ्रष्टाचाराने बरबटलेली पोलीसयंत्रणा कायद्याचे राज्य काय आणणार ? अशा पोलिसांना कठोर शिक्षा देणेच आवश्यक आहे.

गुन्हेगार (?) पोलीस !

पोलीस विभागाने गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवले असल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी प्रयत्न होणे नगण्यच आहे.

नगर येथे जप्त केलेल्या टँकरमधील ‘डिझेल’ चोरतांना पोलिसालाच रंगेहात पकडले !

येथील पोलीस ठाण्यात जप्त केलेल्या बनावट डिझेल चोरीच्या २ टँकरमधील बायोडिझेल चोरी करतांना एका पोलीस कर्मचार्‍यासह चौघांविरुद्ध कट करून बायोडिझेल चोरीचा, तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे

माफीचा साक्षीदार बनण्याची वाझे यांची सिद्धता !

पत्रात वाझे यांनी म्हटले आहे की, ‘या संदर्भातील संपूर्ण वस्तूस्थिती सक्षम न्यायदंडाधिकार्‍यांसमोर सत्य आणि ऐच्छिकपणे प्रकट करण्यास सिद्ध आहे. मला माफी देण्यात यावी.’

संभाजीनगर येथे विवाहाचे आमीष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसावर गुन्हा नोंद !

पीडित महिलेला गर्भपात करण्यास भाग पाडले !

नाशिक येथील सायकलपटू यामिनी खैरनार यांच्याशी कर्नाटक पोलिसांचे गैरवर्तन !

भ्रष्टाचाराने पोखरलेले कर्नाटक पोलीस प्रशासन ! कोरोना लसीचे प्रमाणपत्र दाखवूनही तडजोडीची भाषा करणारे पोलीस जनतेचे रक्षक आहेत कि भक्षक ! पोलीस खात्यात असे भ्रष्ट पोलीस असल्याने जनतेमध्ये पोलीसदलाची प्रतिमा मलीन झाली आहे.

खोट्या गुन्ह्यात अडकवून जामिनासाठी ५० लाख रुपयांची मागणी करणार्‍या महिला पोलीस अधिकार्‍यासह तिघांविरुद्ध गुन्हा !

कुंपणच शेत खायला लागले, तर दाद कुणाकडे मागायची अशी सर्वसामान्यांची स्थिती झाली आहे ! कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक अधिकारी मिळण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही !

जितेंद्र त्यागी (पूर्वाश्रमीचे वसिम रिझवी) यांच्या पत्नीला धर्मांधांकडून घरात घुसून मारहाण आणि धर्मांध पोलीस निरीक्षकाकडून धर्मांधांना साहाय्य !

मारहाणीला साहाय्यक पोलीस निरीक्षक झैदी यांनी साहाय्य केल्याचा आरोप त्यागी यांच्या पत्नीने केला आहे.

भ्रष्ट आणि अत्याचारी पोलिसांना न ओळखणारे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे सहकारी पोलीस हेही अप्रत्यक्षरित्या भ्रष्टच !

समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

पिंपरी-चिंचवडमध्ये (जिल्हा पुणे) ३०० कोटींच्या ‘क्रिप्टो करन्सी’साठी पोलिसानेच केले अपहरण !

जनतेचे रक्षण करणार्‍या पोलिसांनीच अपहरण करणे यांसारखी लज्जास्पद गोष्ट कोणती ? असे पोलीस अधिकारी पोलीस विभागाला कलंकच असल्याने शासनाने त्यांना बडतर्फ करून कायद्यानुसार कठोर शिक्षा करावी, ही अपेक्षा !