पिंपरी-चिंचवडमध्ये (जिल्हा पुणे) ३०० कोटींच्या ‘क्रिप्टो करन्सी’साठी पोलिसानेच केले अपहरण !

‘क्रिप्टो करन्सी’ म्हणजे आभासी चलन

जनतेचे रक्षण करणार्‍या पोलिसांनीच अपहरण करणे यांसारखी लज्जास्पद गोष्ट कोणती ? असे पोलीस अधिकारी पोलीस विभागाला कलंकच असल्याने शासनाने त्यांना बडतर्फ करून कायद्यानुसार कठोर शिक्षा करावी, ही अपेक्षा !

(डावीकडे)बिटकॉइन क्रिप्टो करन्सी (प्रातिनिधिक छायाचित्र),  (उजवीकडे) अटक केलेले आरोपी

पिंपरी (जिल्हा पुणे) – येथील पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या दिलीप खंदारे या पोलीस कर्मचार्‍याने ३०० कोटींच्या ‘क्रिप्टो करन्सी’ आणि ८ लाख रुपयांच्या खंडणीसाठी विनय नावाच्या व्यक्तीचे अपहरण केले होते; परंतु आपल्या मागावर पोलीस असल्याचे समजताच अपहरण केलेल्या व्यक्तीला काही घंट्यांनी सोडून देण्यात आले. या प्रकरणी वाकड पोलिसांनी मुख्य आरोपी दिलीप खंदारेसह एकूण ८ जणांना अटक केली आहे. यातील बहुतांश आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.

दिलीप खंदारे पूर्वी पुणे पोलीस आयुक्तालयात सायबर क्राईमला होते. तेव्हाच अपहरण केलेल्या विनयकडे ३०० कोटी रुपयांची ‘क्रिप्टो करन्सी’ असल्याचे त्यांना ठाऊक होते.