रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात भावपूर्ण वातावरणात गुढीपूजन !

या वेळी ‘हे ब्रह्मदेवा, तुम्‍हीच आम्‍हा सर्व साधकांना साधना करण्‍यासाठी आणि हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करण्‍यासाठी शक्‍ती, बुद्धी, चैतन्‍य अन् आध्‍यात्मिक बळ द्यावे’, अशी प्रार्थना करण्‍यात आली.

महाराष्ट्रभर विविध शहारांत उत्साहपूर्ण वातावरणात शोभायात्रा काढून हिंदु नववर्षाचे स्वागत !

कोरोना महामारीनंतर या वर्षी राज्यांतील विविध शहरांत निघालेल्या शोभायांत्रांच्या माध्यमातून हिंदूंनी नववर्षाचे स्वागत अतिशय उत्साहात केले. वाचा संक्षिप्त वृत्तांत . . .

राज्यातील मंदिरे आणि धार्मिक स्थळे येथे परंपरेनुसार गुढीपाडवा साजरा !

महाराष्ट्रातील विविध प्रसिद्ध मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे येथे तेथील परंपरांनुसार गुढीपाडवा साजरा करण्यात आला.

धुळे जिल्ह्यात ५ ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक गुढीपुजनाने हिंदु नववर्षाचे स्वागत आणि हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प !

महान हिंदु कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्ज, ९६ कोटी, ८ लक्ष ५३ सहस्र १२५ व्या नववर्षाचा आरंभ या गुढीपाडव्याला होत आहे ! त्यानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धुळे जिल्ह्यात मोहाडी, दिवाणमळा, दोंडाईचा, धुळे शहरातील एम्.आय.डी.सी. येथे आणि जुने धुळे येथे सामूहिक गुढीपूजन करून हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा करण्यात आली.

नवी मुंबईत विविध ठिकाणी भव्य नववर्ष स्वागतयात्रा पार पडल्या !

गुढीपाडव्यानिमित्त सीबीडी, नेरूळ, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, ऐरोली आणि वाशी येथे भव्य नववर्ष स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदूंनो, पारतंत्र्यात ढकलणार्‍या साम्राज्यवाद्यांना पराजित करून भारताला अजेय राष्ट्र बनवण्यासाठी लढाऊ वृत्ती हवी !

अजेय राष्ट्र भारताला बनवण्यासाठी हिंदु समाजाने स्वतःमध्ये लढाऊ वृत्ती जागृत करायला हवी ! म्हणून हिंदूंनो, शस्त्रधारी अन् दुष्ट शक्तींसाठी काळ ठरणार्‍या देवतांची उपासना केवळ भजन करून करू नका, तर त्यांच्यातील लढाऊ वृत्तीही अंगी बाणवून भारताला अजेय साम्राज्य बनवा ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विजयोत्‍सवासाठी संघर्ष अटळ !

अखंड आणि अजेय हिंदुस्‍थानची निर्मिती हे हिंदु राष्‍ट्र निर्मितीमागचे लक्ष्य आहे. हिंदु राष्‍ट्र कालगतीनुसार येणारच आहे; पण तत्‍पूर्वी ते प्रत्‍येकाच्‍या मनात येणे आवश्‍यक आहे, तरच तो तिथे रहाण्‍यास पात्र होईल !

गुढीपाडवा म्‍हणजे हिंदूंचा नववर्षारंभदिन आणि सृष्‍टीचा आरंभदिन !

गुढीपाडवा म्‍हणजे हिंदूंचा नववर्षारंभदिन आणि सृष्‍टीचा आरंभदिन ! या दिवशी ब्रह्मांडातील प्रजापति या देवतेच्‍या लहरी सर्वांत अधिक प्रमाणात पृथ्‍वीवर येतात. गुढीमुळे वातावरणातील प्रजापति लहरी कलशाच्‍या साहाय्‍याने घरात प्रवेश करतात. दुसर्‍या दिवसापासून या कलशात पाणी पिण्‍यासाठी घ्‍यावे.

आंब्‍याच्‍या व कडूलिंबाच्‍यापानांचे महत्त्व

इतर पानांपेक्षा आंब्‍याच्‍या पानात अधिक सात्त्विकता असल्‍यामुळे त्‍यांची ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्‍याची क्षमता अधिक असते. गुढीच्‍या टोकाला आंब्‍याची पाने बांधली जातात.

गुढीपाडव्‍याच्‍या दिवशी काढावयाची सात्त्विक रांगोळी

श्रीरामाचे तत्त्व आकृष्‍ट करणारी रांगोळी