
रामनाथी, गोवा – हिंदु नववर्षारंभाच्या निमित्ताने म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने येथील सनातनच्या आश्रमात २२ मार्च २०२३ या दिवशी गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सूर्योदयाच्या वेळी मंगलमय वातावरणात विधीवत् गुढीपूजनानंतर पंचांगस्थ गणपतिपूजन आणि नूतन संवत्सरफलश्रवण (नवीन वर्ष कसे असेल, याचे ज्योतिषशास्त्रदृष्ट्या माहितीचे श्रवण) करण्यात आले. गुढीचे पूजन सनातन पुरोहित पाठशाळेतील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. श्रीनिवास देशपांडे (वय ११ वर्षे) याने केले. या वेळी ‘हे ब्रह्मदेवा, तुम्हीच आम्हा सर्व साधकांना साधना करण्यासाठी आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी शक्ती, बुद्धी, चैतन्य अन् आध्यात्मिक बळ द्यावे’, अशी प्रार्थना करण्यात आली.
Fake Currency Racket : कर्नाटक : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रहित !
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान