पाडव्‍याच्‍या दिवशी वर्षफल ऐकण्‍याचा लाभ !

वर्षाच्‍या आरंभी त्‍या वर्षात घडणार्‍या बर्‍या-वाईट घडामोडींविषयी माहिती कळल्‍यास त्‍याप्रमाणे उपाययोजना करून आधीच व्‍यवस्‍था करून ठेवणे सोपे जाते. हाच वर्षफल ऐकण्‍याचा खरा लाभ असतो.

हिंदु संस्‍कृतीला वर्धिष्‍णू करणारा गुढीपाडवा !

गुढीपाडवा, म्‍हणजेच चैत्र शुक्‍ल प्रतिपदेच्‍या दिवशी शिशिर ऋतू संपून वसंत ऋतूचेे आगमन झालेले असते आणि ही संपूर्ण चराचर सृष्‍टी सृजनाच्‍या गंधाने रंगून गेलेली असते. कुठे शुभ्र मोगर्‍याला बहर आलेला असतो, तर कुठे आम्रवृक्षाच्‍या मोहराचा सुगंध दरवळत असतो. वृक्ष, वनस्‍पती चैत्र पालवीने फुलत असतात.

गुढीची झुकलेली स्‍थिती

गुढी थोडीशी झुकलेल्‍या स्‍थितीत ठेवल्‍याने तिची रजोगुणी ईश्‍वरी चैतन्‍याच्‍या लहरी प्रक्षेपण करण्‍याची क्षमता वाढल्‍याने जिवांना वातावरणातील चैतन्‍याचा लाभ दीर्घकाळ मिळण्‍यास साहाय्‍य होते.

परिपूर्ण भारतीय कालमापन पद्धत !

हिंदु कालमापन पद्धतीचे महत्त्व जाणून छत्रपती शिवाजी महाराजांनी बाळकृष्‍ण आणि रामकृष्‍ण संगमेश्‍वरकर या बंधूंकडून ‘करण कौस्‍तुभ’ हा ग्रंथ सिद्ध करवून घेतला. छत्रपती संभाजी महाराजांनी गागाभट्ट यांच्‍याकरवी ‘समयनय:’ हा असाच हिंदुु कालमापन शास्‍त्रावर आधारित ग्रंथ लिहून घेतलेला आहे.

भाजपने निवडणुकीच्या घोषणापत्रात हलाल प्रमाणपत्र प्रतिबंधक कायदा करण्याचा उल्लेख करावा ! – हिंदु जनजागृती समिती

केवळ हिंदु जनजागृती समितीच नाही, तर भाजपच्या कर्नाटकातील अनेक नेत्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. ‘हिंदूंना हलाल मांस खरेदी करण्याची सक्ती का केली जात आहे ?’

सोलापूर शहरात गुढीपाडव्‍याला २ ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन !

बाळीवेस येथून पहिली शोभायात्रा, तर जुळे सोलापूर येथील आसरा चौकातून दुसरी शोभायात्रा दुपारी ४.३० वाजता निघेल, अशी माहिती समितीचे संस्‍थापक रंगनाथ बंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हिंदु नववर्षारंभ विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २१ मार्चला दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

गुढीपाडव्याला कडूनिंबाच्या पानांची चटणी का खातात ?

कडूनिंबाची पाने चवीला कडू असतात. कडू चवीच्या पदार्थांमध्ये आकाश आणि वायु ही महाभूते प्रामुख्याने असतात. ही महाभूते कफातील महाभूतांच्या विरुद्ध गुणधर्माची आहेत. कडूनिंबाची चटणी खाल्ल्याने कफाचे विकार नियंत्रणात रहाण्यास साहाय्य होते.

गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाच्या धार्मिक कृती

गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अभ्यंगस्नान करतात. शरिराला तेल लावून चोळून ते त्वचेत जिरविणे आणि नंतर ऊन (गरम) पाण्याने स्नान करणे म्हणजे अभ्यंगस्नान. अभ्यंगस्नान करतांना देशकालकथन करावे लागते.

ब्रह्मध्वज पूजा-विधी

हिंदूंचा वर्षारंभाचा दिवस (२५ मार्च २०२०) म्हणजे चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा अर्थात् गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयानंतर लगेचच गुढीचे पूजन करून गुढी उभारावी, असे शास्त्रात सांगितले आहे. गुढीचे पूजन शास्त्रानुसार कसे करावे, हे मंत्रांसह वाचकांसाठी येथे देत आहोत.