हिंदु नववर्षानिमित्त चिंचवड (पुणे) येथे भव्य शोभायात्रेचे आयोजन !

प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच नववर्षारंभ अर्थात् गुढीपाडवा या दिवशी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी भव्य शोभा यात्रेचे आयोजन ‘संस्कृती संवर्धन विकास महासंघा’च्या वतीने करण्यात आले आहे.

गुढीपाडवा सांस्कृतिक आणि सामाजिक सेवा संस्थानकडून ९ एप्रिल या दिवशी हिंदु नववर्ष शोभायात्रा !

गुढीपाडव्यानिमित्त गुढीपाडवा सांस्कृतिक आणि सामाजिक सेवा संस्थानकडून कळंबोली येथे हिंदु नववर्ष शोभायात्रेचे आयोजन केले आहे. ही भव्य शोभायात्रा ९ एप्रिल या दिवशी सकाळी ८ वाजता तरंग सोसायटी ..

हिंदु नववर्ष स्वागत समितीकडून ९ एप्रिल या दिवशी स्वागत यात्रेचे आयोजन !

शोभायात्रेत महिला दुचाकी पथक, लेझीम पथक, लाठीकाठी पथक, ध्वज पथक, सायकल पथक, चित्ररथ, मृदुंग टाळ आणि भजनी मंडळ, वारकरी संप्रदाय आणि विविध संघटना सहभागी होणार आहेत. ‘आपण सर्वांनी मित्र परिवारासह पारंपरिक वेषात सहभागी व्हावे’, असे आव्हान समितीने केले आहे

गुढीपाडव्‍यानिमित्त गोवा दूरदर्शनवर सनातनच्‍या साधिका सौ. समृद्धी गरुड यांची मुलाखत

गोवा दूरदर्शनवर गुढीपाडव्‍याच्‍या निमित्ताने  आयोजित करण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमात सनातन संस्‍थेच्‍या साधिका सौ. समृद्धी गरुड यांची मुलाखत घेण्‍यात आली. या मुलाखतीत सौ. गरुड यांनी गुढीपाडव्‍याविषयी सविस्‍तर माहिती दिली.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात २० ठिकाणी सामूहिक गुढी पूजन !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग आणि स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेतले जातात. गुढी पाडव्याच्या निमित्ताने या वर्गांमध्ये येणार्‍या धर्मप्रेमींनी धर्मशास्त्रानुसार गुढीचे पूजन करून हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेतली.

पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी उभारली सामूहिक गुढी !

आळंदेवाडी, पारगाव, हडपसर, निरा, केडगाव, मंचर, हिवरेगाव, नारायणपूर, दिवेगाव, डाळिंबगाव, श्री क्षेत्र वडगाव काशिंबेक आदी ठिकाणी धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी सामूहिक गुढी उभारून गुढीचे पूजन केले, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेतली.

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने उत्तर आणि ईशान्‍य भारतात ‘हिंदु नववर्ष’निमित्ताने ‘ऑनलाईन’ विशेष कार्यक्रम पार पडला !

या कार्यक्रमात ‘हिंदु नववर्ष चैत्र शुक्‍ल प्रतिपदा या दिवशी साजरे का केले जाते ? या दिवशी ब्रह्मध्‍वज म्‍हणजेच गुढी का उभारली जाते ? आणि ती उभारण्‍याची योग्‍य पद्धत’, यांसह अन्‍य शास्‍त्रीय माहिती विशद करण्‍यात आली.

सर्वांना प्रेम, चांगली वागणूक आणि प्रत्येकाचा आदर बाळगूया !  

हिंदु धर्माचे संस्कार, परंपरा, विचारधारा आणि आदर्श असाच पुढे वाढवत ठेवू. सर्वांना प्रेम, चांगली वागणूक देऊन प्रत्येकाचा आदर बाळगूया, असा उपदेश प.पू. कानिफनाथ महाराज यांनी भक्तगणांना दिला.

नागपूर येथे हिंदु नववर्षानिमित्त विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती !

नागपूर येथे हिंदु नववर्षानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात आले. गुढीपाडव्याविषयी माहिती देणार्‍या हस्तपत्रकाचे वितरण करण्यात आले. मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणी भित्तीपत्रके लावण्यात आली.

नंदुरबार येथे गुढीपाडव्यानिमित्त धर्मप्रसार आणि सामूहिक गुढीपूजन पार पडले !  

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त जिल्ह्यात गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रबोधनपर भित्तीपत्रके लावणे, फलकलेखन करणे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी यांना भेटून हिंदु नववर्षच्या शुभेच्छा देणे, तसेच सामूहिक गुढी उभारणे आदी माध्यमातून धर्मप्रसार आणि प्रबोधन करण्यात आले.