हिंदु संस्कृतीला वर्धिष्णू करणारा गुढीपाडवा !
गुढीपाडवा, म्हणजेच चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी शिशिर ऋतू संपून वसंत ऋतूचेे आगमन झालेले असते आणि ही संपूर्ण चराचर सृष्टी सृजनाच्या गंधाने रंगून गेलेली असते. कुठे शुभ्र मोगर्याला बहर आलेला असतो, तर कुठे आम्रवृक्षाच्या मोहराचा सुगंध दरवळत असतो. वृक्ष, वनस्पती चैत्र पालवीने फुलत असतात.