ध्यानमंदिरात पू. संदीप आळशी यांना नामजप करतांना पाहून ‘आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी नामजपादी उपाय किती गांभीर्याने करायला हवेत’, याची जाणीव होणे
पू. संदीपदादा संत असूनही एवढ्या गांभीर्याने आणि तळमळीने नामजपादी उपाय करतात, तर ‘आम्ही साधकांनी किती कठोर प्रयत्न करायला हवेत’, याची मला तीव्रतेने जाणीव झाली. ‘असे केल्यानेच आध्यात्मिक त्रास लवकर न्यून होणार आहे’, हेही माझ्या लक्षात आले.