श्री गणपति विसर्जनासंदर्भात आपल्याला हे ठाऊक आहे का ?

#Ganeshotsav #Ganeshotsav2022 #GaneshChaturthi #GaneshChaturthi2022 Ganesh Chaturthi गणेशचतुर्थी #गणेशचतुर्थी गणेश चतुर्थी #Ganapati #गणपती #गणेशमूर्ती #Ganeshmurti #Ganesh #गणेश गणेश Ganesh

‘भारत दारिद्र्यात असतांना फटाक्यांच्या माध्यमांतून कोट्यवधी रुपये जाळणारे देशद्रोहीच होत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, फटाक्यांचे दुष्परिणाम जाणा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सध्या गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र फटाके मोठ्या प्रमाणात फोडले जातात. या फटाक्यांच्या माध्यमातून होणारे ध्वनीप्रदूषण, वायूप्रदूषण याचसमवेत आध्यात्मिक स्तरावर होणारे नकारात्मक परिणाम बघता, याचे तोटेच अधिक आहेत. अशा परिस्थितीत ‘फटाके फोडणे गणपतीला आवडेल कि त्याचा नामजप केलेला आवडेल ?’ याचा विचार करा !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गणेशोत्सव २०२२

१. गौरी विसर्जनाच्या वेळी श्री गणपति विसर्जन करायचे असतांना त्या दिवशी कोणताही वार किंवा कितवाही दिवस असला, तरी त्या दिवशी विसर्जन करता येते.

२. घरात गर्भवती स्त्री असतांना श्री गणपति विसर्जन करता येते. अशा वेळेस विसर्जन न करण्याची प्रथा चुकीची आहे.

३. गणपतीपूजन १० दिवस करणे शक्य नसेल, तर पूजनाचे दिवस न्यून करून दीड दिवस, पाच किंवा सात दिवस गणपतिपूजन करून नंतर मूर्तीचे विसर्जन करता येईल.

अन्य महत्त्वाची सूत्रे . . .

१. श्री गणेशचतुर्थीच्या पूर्वी अशौच (सोयर, सूतक) संपत नसेल, तर त्या वर्षी गणपति बसवू नये.

२. श्री गणपति स्थापन आणि पूजन झाल्यावर अशौच (सोयर, सूतक) आले, तर दुसर्‍यांकडून लगेच गणपति विसर्जन करून घ्यावे. अशा वेळेस उत्सवाचे दिवस न्यून झाले, तरी चालतील.

श्री गणेशमूर्ती भंगल्यास काय करावे ?

उत्सवाच्या दिवसांत काही कारणाने श्री गणेशमूर्ती भंगली, तर तिचे लगेच विसर्जन करावे. त्यानंतर पुन्हा श्री गणेशमूर्ती आणून पूजन करू नये.’

(साभार : २१ व्या शतकातील कालसुसंगत आचारधर्म, प्रकाशक – श्री. अनंत (मोहन) धुंडीराज दाते)


कार्यारंभी श्री गणेशाला आवाहन करण्यामागील असेही कारण !

‘आपण सूक्ष्म विचार केला, तर असे जाणवते की, आपल्या सर्व इंद्रियांचा एक गण आहे आणि या सर्व गणांचा पती म्हणजे मुख्य ‘मन’ आहे. कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पाडायचे असेल, तर हा गणपति ठिकाणावरच असायला हवा. म्हणूनच प्रथम गणपतीला पूजण्याचा अर्थ सरळ सोप्या भाषेत असा होतो की, मनाला कार्यारंभाच्या पूर्वी शांत आणि स्थिर करणे, म्हणजेच मनाच्या अस्थिरतेपणामुळे विघ्ने निर्माण न होता सर्व कार्य सुरळीतपणे पार पाडावीत.’

– सौ. मोहिनी हळर्णकर

(साभार : दैनिक ‘गोमंतक’, २० ऑगस्ट २००१)


बुद्धीची देवता श्री महागणपति !

विश्वाच्या आरंभाच्या स्थानावरील ‘ॐकार’स्वरूप ईश्वर हा श्री महागणपति आहे.

‘विश्वाचा आरंभ ‘ॐकारा’तून झाला असून हे विश्व म्हणजेच ‘ॐकार’ होय, असे ‘श्रुति-स्मृति’मध्ये म्हटलेले आहे. ‘ॐकार’ रूपातील हे विश्वाचे उत्पत्ती स्थान ईश्वरस्वरूप आहे. भगवान पतंजलींनी म्हटलेले आहे की, या स्थानावर सर्वज्ञबीज असलेला ईश्वर असून त्याचे वाचक ‘ॐकार’स्वरूप किंवा प्रणवमंत्राची शब्दमूर्ती आहे. विश्वाच्या या आरंभाच्या स्थानावरील ‘ॐकार’स्वरूप ईश्वर हा श्री महागणपति आहे. ॐकार हेच श्री गणपतीचे मुख्य रूप आहे.

‘श्रीगणपत्यथर्वशीर्षम्’ यामध्ये श्री गणेशाचे स्तवन करतांना एकदंत, लंबोदर, शूर्पकर्णक ही नावे घेऊन केले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ॐकार स्वरूप पाहिले, तर त्यात पुढील भाग हत्तीचे मुख असलेला देव श्री गजानन झाला.

‘श्रीमहागणपतिसहस्रनामस्तोत्र’ या महर्षि व्यासांनी लिहिलेल्या स्तोत्रामध्ये श्री गणेशाचे स्तवन हे ‘बुद्धी’ आणि ‘बुद्धीप्रिय’ असेही करण्यात आले आहे.’

– प्रकाश श्री. खांडेपारकर

(साभार : दैनिक ‘गोमंतक’, २० ऑगस्ट २००१)