मुंबई येथे १० देशांच्या ‘महावाणिज्यदूतां’नी घेतले मानाच्या श्री गणेशमूर्तींचे दर्शन !

जी.एस्.बी. गणेशात्सव मंडळ येथील सुवर्ण गणेश 

मुंबई, ३ सप्टेंबर (वार्ता.) – विविध देशांच्या मुंबई स्थित महावाणिज्यदूतांनी शहरातील मानाच्या श्री गणेशमूर्तींचे दर्शन घेतले. गणरायांचे दर्शन आणि भक्तीभावाने भारावलेले वातावरण पाहून ‘अद्भूत अनुभूती’ आल्याची प्रतिक्रिया त्यांनी या वेळी व्यक्त केली. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने इस्रायल, स्वित्झर्लंड, अर्जेटिना, बेलारूस, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, पोलंड, श्रीलंका, इंग्लंड आणि इंडोनेशिया या देशांच्या १० ‘महावाणिज्य दूतां’नी हे दर्शन घेतले. पर्यटनाच्या दृष्टीने याचा लाभ घेण्याविषयी सांगण्यात आले.

माटुंगा येथील सुवर्ण गणेश अशी ओळख असलेले जी.एस्.बी. गणेशात्सव मंडळ, लालबाग येथील गणेश गल्ली आणि लालबागचा राजा, तसेच गिरगावच्या सर्वात जुन्या केशवजी नाईक चाळ येथील श्री गणेशमूर्ती यांचा यात समावेश होता. सर्व गणेशोत्सव मंडळांच्या वतीने त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यांना या उत्सवाविषयी माहिती देण्यात आली.