चिंचपोकळीच्या गणेशोत्सवात महिलेची छेड काढणार्‍याला मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून चोप !

चिंचपोकळीच्या गणेशोत्सवात महिलेची छेड काढणार्‍याला मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून चोप

मुंबई – ३ सप्टेंबरच्या रात्री चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेशोत्सव मंडळात दर्शनाच्या वेळी एका मद्यपी तरुणाकडून महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न झाल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. याविषयी मंडळाचे सचिव प्रणील पांचाळ यांनी सांगितले, ‘‘श्री गणेशमूर्ती दर्शनासाठीची गर्दी नियंत्रणाबाहेर गेली होती. त्या वेळी तेथे पोलीस बंदोबस्त नव्हता. संबंधित तरुणाने महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली. त्यातून ही मारहाणीची घटना घडली आहे. आम्ही पोलिसांकडे अतिरिक्त बंदोबस्ताची मागणी केली आहे.’’