पेडणे तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत वसलेली मुरमुसे, तुये येथील श्री सटीदेवी !

पेडणे तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत वसलेली मुरमुसे, तुये येथील श्री सटीदेवीची जत्रा १२ जानेवारी २०२१ या दिवशी आहे. ही देवी नवसाला पावणारी आणि सर्वांचे रक्षण करणारी आहे. श्री सटीदेवीच्या बाजूला श्री महालक्ष्मीदेवीचीही मूर्ती आहे.

कुडासे (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील भक्तांवर कृपाछाया धरणार्‍या श्री सातेरी-रवळनाथ देवस्थानचा जत्रोत्सव !

श्री सातेरी-रवळनाथ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव मार्गशीर्ष कृष्ण पक्ष त्रयोदशी, ११ जानेवारी २०२१ या दिवशी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

कोटी कोटी प्रणाम !

• चराठा (सावंतवाडी) गावच्या श्री सातेरीदेवीचा आज जत्रोत्सव !
• पावस, रत्नागिरी येथील स्वामी स्वरूपानंद यांची आज जयंती

चराठा (सावंतवाडी) गावच्या श्री सातेरीदेवीचा आज जत्रोत्सव

पूर्वी चराठा हे गाव ‘मौजे चराठिये’ या नावाने ओळखले जायचे. गावच्या श्री सातेरीदेवीचा वार्षिक जत्रोत्सव मार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्बादशी, कलियुग वर्ष ५१२२ (१० जानेवारी २०२१) या दिवशी साजरा होत आहे.

आपत्काळातील मकरसंक्रांत कशी साजरी करावी ?

‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेले काही मास सण-उत्सव साजरे करण्यास किंवा व्रते आचरण्यात काहीसे निर्बंध होते. कोरोनाची परिस्थिती अद्याप निवळली नसली, तरी ती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. अशा वेळी सण साजरे करतांना पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.

आपत्काळात तरून जाण्यासाठी भक्त होणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सध्या आपत्काळास प्रारंभ झाला आहे. या आपत्काळात तरून जाण्यासाठी भगवंताची भक्ती करणे आवश्यक आहे. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून शुद्ध मनाने भक्ती म्हणजेच साधना केली पाहिजे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

धनुर्मासाचे माहात्म्य

‘१६.१२.२०२० ते १३.१.२०२१ या कालावधीत धनुर्मास आहे. या मासाचे पाच गुरुवार आणि शुक्रवार अत्यंत महत्त्वाचे असतात . . . या मासात येणार्‍या एकादशीला ‘वैकुंठ एकादशी’ म्हटले जाते. धनुर्मासात या दिवसाला सर्वाधिक महत्त्व असते.

नेवरा येथील श्री महालक्ष्मी संस्थानचा २१ वा नूतनमूर्ती प्रतिष्ठापना वर्धापनदिन !

नेवरा येथील श्री महालक्ष्मी संस्थानचा नूतनमूर्ती प्रतिष्ठापनेचा २१ वा वर्धापनदिन ७, ८ आणि ९ जानेवारी २०२१, असा ३ दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक विधी होणार आहेत.