भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मोरजी, पेडणे, गोवा येथील श्री भूमिकादेवीचा जत्रोत्सव !
श्री देवी सातेरी किंवा भूदेवी अर्थात भूमिकादेवीची उपासना आपल्या इच्छित प्राप्तीसाठी करतात. प्राचीन काळापासून भूदेवीची उपासना दृढ श्रद्धेने केली जाते.
कोटी कोटी प्रणाम !
• पाचवाडा, उसगाव येथील श्री आदिनाथ देवस्थानचा आज कालोत्सव !
• गुरु गोविंदसिंह यांची जयंती (नानकशाहीनुसार)
पाचवाडा, उसगाव येथील श्री आदिनाथ देवस्थानचा आज कालोत्सव
पाचवाडा, उसगाव येथील श्री आदिनाथ देवस्थानचा कालोत्सव ५ जानेवारीपासून साजरा होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक विधी होणार आहेत. कालोत्सवानिमित्त श्री आदिनाथ देवस्थानची माहिती जाणून घेऊया.
कोटी कोटी प्रणाम !
• वेरे, गोवा येथील श्री शांतादुर्गा नेर्लेकरीण देवीचा आज कालोत्सव ! • श्री मोरया गोसावी पुण्यतिथी
• मध्यप्रदेश येथील श्री अनंतानंद साईश यांचा महानिर्वाणोत्सव
• सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांचा आज वाढदिवस
वेरे, गोवा येथील श्री शांतादुर्गा नेर्लेकरीण देवीचा कालोत्सव !
मार्गशीर्ष कृष्ण पक्ष पंचमीच्या रात्री काणूक, पालखी, काला पावणी असेल. मार्गशीर्ष कृष्ण पक्ष षष्ठीच्या दुपारी गौळणकाला, पालखी असणार आहे. सप्तमीला श्रींचे पालखीतून देवळात आगमन झाल्यानंतर आवळी भोजन, होम आणि रात्री रेवळेतून काणूक पालखी, असे धार्मिक कार्यक्रम आहेत.’
कोटी कोटी प्रणाम !
• साटेली येथील श्री सातेरीदेवी, श्री शांतादुर्गादेवी, श्री देव पुरमार यांचा जत्रोत्सव !
• कसाल येथील श्री पावणाईदेवी आणि श्री रवळनाथदेवाचा आज वार्षिक जत्रोत्सव !
• ओरोसचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथाचा आज वार्षिक जत्रोत्सव !
• पू. के.वि. बेलसरे यांचे पुण्यस्मरण (दिनांकानुसार)
साटेली (दोडामार्ग) येथील श्री सातेरीदेवी, श्री शांतादुर्गादेवी, श्री देव पुरमार यांचा जत्रोत्सव
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील साटेली येथील श्री देवी सातेरी, श्री देवी शांतादुर्गा आणि श्री देव पुरमार या देवतांचा जत्रोत्सव मार्गशीर्ष कृष्ण पक्ष चतुर्थी (३ जानेवारी २०२१) या दिवशी साजरा होत आहे.
कसाल (सिंधुदुर्ग) येथील श्री पावणाईदेवी आणि श्री रवळनाथदेवाचा वार्षिक जत्रोत्सव
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल येथील श्री पावणाईदेवी आणि श्री देव रवळनाथ मंदिर हे जागृत देवस्थान आहे. या देवतांचा वार्षिक पालखी उत्सव आणि जत्रोत्सव मार्गशीर्ष कृष्ण पक्ष चतुर्थी (३ जानेवारी २०२१) या दिवशी साजरा होत आहे.
ओरोसचे (कुडाळ) ग्रामदैवत श्री देव रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव
मंदिरात प्रतिवर्षी दसरा, हरिनाम सप्ताह, त्रिपुरारी पौर्णिमा आणि दीपोत्सव कार्यक्रम होतो. या देवतेचा जत्रोत्सव मार्गशीर्ष कृष्ण पक्ष चतुर्थी या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी ३ जानेवारी २०२१ या दिवशी जत्रोत्सव साजरा होणार आहे.