‘मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ, तसेच उत्पादने वाण म्हणून देणे’, ही चिरंतन आणि सर्वाेत्तम भेट असल्याने त्यासाठी जिज्ञासूंना प्रवृत्त करा !

साधकांनी वाचक, जिज्ञासू, आदींना संपर्क करून सात्त्विक वाण देण्याचे महत्त्व सांगावे आणि सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ अन् उत्पादने वाण म्हणून देण्यास प्रवृत्त करावे.

हिंदु धर्माची विकासशीलता आणि कायाकल्प लक्षात घ्या !

हॉलंडपासून रशियापर्यंत बहुतेक सर्व देशांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करून ठेवला आहे तरीही त्यांचे खरे आकर्षण वेद, उपनिषद आणि भारतीय दर्शनशास्त्र हेच राहिले आहे.

श्रीमंतयोगी प्रतिष्ठानच्या वतीने वाडा येथील आदिवासी भागांत फराळ आणि फटाके यांचे वाटप

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित झालेले श्रीमंतयोगी प्रतिष्ठान आज मोठ्या संख्येने युवकांना एकत्र करून सामजिक क्षेत्रात कार्य करत आहे. संघटना बरेच विषय हाताळून हिंदु धर्म कसा अबाधित राहील, या दृष्टीने प्रयत्न करत आहे.

गोवर्धनगिरिधारी श्रीकृष्ण !

भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून धरून इंद्राच्या कोपापासून गोकुळवासियांचे रक्षण केले. ‘आपला अन्नदाता आणि रक्षणकर्ता गोवर्धन पर्वतच आहे’, याची सर्वांना खात्री पटली अन् त्यांची श्रीकृष्णावरील भक्तीही वाढली. शेवटी इंद्र थकला आणि त्याने वृष्टी बंद केली. पुन्हा सर्व लोक गोकुळात आले.

यमद्वितीयेचे रहस्य !

‘कार्तिक शुक्ल द्वितीया हा दिवस ‘यमद्वितीया’ या नावाने भारतवर्षांत प्रसिद्ध आहे. त्या निमित्ताने…

फटाक्यांमुळे महाराष्ट्रात ३० हून अधिक आगीच्या घटना, अनेक जण घायाळ !

प्रदूषण, आर्थिक हानी आणि दुर्घटना यांना कारणीभूत ठरणारे फटाके टाळल्यास दिवाळी अधिक आनंदाची होईल !

सध्या दिवाळी साजरी करण्याचे पालटलेले स्वरूप, म्हणजे कष्ट करावे लागू नयेत, यासाठी काढलेली पळवाट !

सध्या दिवाळी साजरी करण्यासाठी कुटुंब कबिला (काही कुटुंबे) कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी (‘हिल स्टेशन’वर) मांसाहारादी चापायला निघून जातो. नातेवाईक घरी यायला नकोत आणि दिवाळीचा फराळ बनवायला नको, यांसाठी काढलेली ही युक्ती भलतीच लोकप्रिय झालेली आहे.

धर्म-राष्ट्र जागृती करणारा ‘सनातनचा आकाशकंदिल’

हिंदूंमध्ये धर्म आणि राष्ट्र यांच्याप्रती जागृती निर्माण होण्याची आवश्यकता आहे. असे झाले तरच दिवाळी ही खर्‍या अर्थाने साजरी होऊ शकेल. हाच संदेश सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी ‘सनातन संस्था’ धर्मजागृती आणि राष्ट्रजागृती करणारे लिखाण असलेल्या आकाशकंदिलाची निर्मिती करते.

देवदिवाळी

आपले कुलदैवत आणि इष्टदेवता यांच्याबरोबरच स्थानदेवता, वास्तूदेवता, ग्रामदेवता आणि गावातील अन्य मुख्य अन् उपदेवता यांचे, तसेच महापुरुष, वेतोबा इत्यादी निम्नस्तरीय देवता यांचे पूजन करून त्यांना त्यांच्या मानाचा भाग पोचवण्याचे कर्तव्य या दिवशी पार पाडले जाते. देवदिवाळीला पक्वान्नांचा महानैवेद्य दाखवला जातो.

दीपावलीचे महत्त्व

‘दिवाळी’ हा शब्द ‘दीपावली’ या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात.