लक्ष्मीपूजन
‘प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध, ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी लतापल्लवांनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा या दिवसाचा विधी आहे.
‘प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध, ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी लतापल्लवांनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा या दिवसाचा विधी आहे.
मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन कृष्ण चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले.
वेद काळात मूळ हिंदु धर्मानुसार वर्षप्रतिपदा (गुढीपाडवा), श्री गणेशचतुर्थी, दसरा, दीपावली आणि हुताशनी (होळी) हे फक्त ५ उत्सव होते. या उत्सवांचे त्या काळी पुष्कळ महत्त्व होते. दिवाळी हा मानवाचा दयास्वरूप सण आहे….
‘दीप्यते दीपयति वा स्वयं परं चेति ।’ म्हणजे ‘स्वतः प्रकाशतो आणि दुसर्यांना प्रकाशित करतो तो दीप.’ दीप किंवा दीपज्योत हे बुद्धी आणि ज्ञान यांचे प्रतीक आहे. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ म्हणजे ‘अज्ञानरूपी तिमिराकडून ज्ञानरूपी प्रकाशज्योतीकडे ने’, असा त्याचा अर्थ आहे.
या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात. पुरुष हे शिवाचे आणि स्त्री हे दुर्गादेवीचे प्रतीक आहे. ओवाळल्यामुळे पत्नीमध्ये दुर्गातत्त्व कार्यान्वित होते आणि पतीचे औक्षण केल्यानंतर त्याची कुंडलिनीशक्ती जागृत होऊन त्याच्यातील सुप्तावस्थेत असणारे शिवतत्त्व प्रकट होते.
‘या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वतःच्या घरी पत्नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे आणि तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसेल, तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे.’
श्रीविष्णूचा (बाळकृष्णाच्या मूर्तीचा) तुळशीशी विवाह लावून देणे, हा तुळशी विवाहाचा विधी आहे. पूर्वीच्या काळी बालविवाहाची पद्धत होती. विवाहाच्या पूर्वदिवशी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचा अन् आवळे ठेवतात. हा विवाहसोहळा सायंकाळी करतात.
अधिक रांगोळ्यांसाठी पहा सनातनचा ग्रंथ ‘सात्त्विक रांगोळ्या (भाग १)’
‘दीप’ या शब्दाचा खरा अर्थ ‘तेल आणि वात यांची ज्योत’. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’, म्हणजे ‘अंधाराकडून ज्योतीकडे म्हणजे प्रकाशाकडे जा’, अशी वेदांची आज्ञा आहे.
नरकासुर वध ! श्रीकृष्णाची ही कामगिरी अलौकिक अशी होती. नरकासुराच्या वधामुळे जिकडे तिकडे आनंद झाला. शत्रूच्या रक्ताचा टिळा लावून श्रीकृष्ण घरी येताच त्यास मंगलस्नान घालण्यात आले. या ‘विजयाची स्मृती’ म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशी हा दिवस सर्व भारतीय लोक ‘नरकचतुर्दशी’ म्हणून साजरा करत असतात.’