मुंबईच्या सुशोभिकरण प्रकल्पाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मान्यता !

मुंबई सुशोभिकरण प्रकल्प आराखड्याला मुख्यमंत्र्यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. सुशोभिकरण प्रकल्पाच्या अंतर्गत रस्ते, पूल, पदपथ, वाहतूक बेटे, समुद्रकिनारे, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुधारणा आणि आकर्षक प्रकाशयोजना या प्रमुख पालटांसह एकूण १६ विविध प्रकारची कामे केली जाणार आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यांची नक्कल केल्याप्रकरणी ७ जणांवर गुन्हे नोंद !

शिंदे गटाचे नौपाडा येथील उपविभागप्रमुख दत्ताराम गवस यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून ‘ढाल-तलवार’ हे चिन्ह !

अंधेरीची पोटनिवडणुकीत ‘मशाल’ आणि ‘ढाल-तलवार’ यामध्ये चुरशीची लढत होणार आहे.

शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवले !

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र ‘शेअर’ करत ‘जिंकून दाखवणारच !’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला ठेचले जाईल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

शिवसेना राष्ट्रभक्तांची आहे. भारतात राहून ‘पाकिस्तान झिंदाबाद’ च्या घोषणा देणार्‍या पिलावळींना ठेचून काढले जाईल. देशाची एकात्मता आणि अखंडता यांना नख लावण्याचा प्रयत्न केला, तर खपवून घेतले जाणार नाही.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप !

प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला, तर दुसरीकडे बीकेसी मैदानात (वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला.

‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’च्या माध्यमातून घराजवळ आरोग्य सुविधा देण्यात येईल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

राज्याची ग्रामीण आरोग्ययंत्रणा बळकट करण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी आरोग्यक्षेत्रासाठी दुप्पट निधी देण्यात येईल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निनावी दूरध्वनीद्वारे जिवे मारण्याची धमकी !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निनावी दूरध्वनीद्वारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. स्फोट घडवून एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याचा कट रचण्यात  आल्याची माहितीही गुप्तचर विभागाला प्राप्त झाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अन्वेषण चालू आहे.

माथाडी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

माजी आमदार स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त गुणवंत कामगार पुरस्कार, माथाडी भूषण पुरस्कार वितरण सोहळा झाला. त्या वेळी शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

नाशिक येथील स्वामीनारायण संप्रदायामुळे भारतियांचे विचार आणि संस्कृती यांना वैश्विक आयाम लाभला! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

बी.एस्.पी.एस्. स्वामीनारायण संप्रदाय हा १५० हून अधिक सेवाभावी आणि विधायक उपक्रमांच्या माध्यमातून जगभर कार्यरत आहे. त्याग भावनेतून भारतियांचे विचार आणि संस्कृती यांना या संप्रदायामुळे वैश्विक आयाम लाभला आहे.