मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निनावी दूरध्वनीद्वारे जिवे मारण्याची धमकी !

जोपर्यंत आतंकवाद्यांचा आणि त्यांच्या मूळ स्रोतांचा समूळ नायनाट होत नाही, तोपर्यंत असे होतच रहाणार !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निनावी दूरध्वनीद्वारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. स्फोट घडवून एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याचा कट रचण्यात  आल्याची माहितीही गुप्तचर विभागाला प्राप्त झाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अन्वेषण चालू आहे. पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांकडूनही मुख्यमंत्र्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या आंतकवादी संघटनेवर केंद्रशासनाने बंदी घातल्यानंतर एकनाथ शिंदे यांना ही धमकी आली आहे का ?’, या दृष्टीने पोलीस अन्वेषण करत आहेत.