आमचे सरकार कोणतीही कारवाई सूडबुद्धीने करणार नाही ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस नियमानुसार पडताळणी करून कार्यवाही करतात. महिलेच्या तक्रारीत तथ्य असेल, तर आव्हाड यांच्यावर कारवाई होईल.

पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी १६१ गावांच्या ‘क्लस्टर एस्.टी.पी.’ प्रकल्पाविषयी समन्वयाने नियोजन करा ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

नवनिर्मित इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांना विशेषतः हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नगरपालिकांमधील बाजारपेठेतील महत्त्वाचे रस्ते विकास, पाणीपुरवठा, तसेच या परिसरातील वस्त्रोद्योगासह पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील.

पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षकाचे नियंत्रण कक्षात स्थानांतर !

येथील एका पोलाद व्यावसायिकाची चौकशी चालू आहे. या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजीर शेख यांच्याकडे होती. या प्रकरणाची चौकशी प्रामाणिक अधिकार्‍याकडून करण्यात यावी, अशी विनंती प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

अफझलखानाच्या थडग्याजवळील अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त !  

हिंदुत्वनिष्ठांच्या २० वर्षांच्या लढ्याला यश !
पोलिसांचा चोख बंदोबस्त : परिसरात जमावबंदी लागू !

एकनाथ शिंदे यांच्या गटातील सर्व आमदार आणि खासदार यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा देणार !

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अभिनेता सलमान खान यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्यात आली आहे. अंबानी कुटुंबियांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात आली आहे.

वर्ष २०१९ मध्येच युतीचे सरकार यायला हवे होते ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

गेल्या अडीच वर्षांमध्ये राज्यातील विकासकामे मंदावली होती, त्याला गती देण्याचे काम युतीचे सरकार करत आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार असून लोकांच्या भावना पूर्ण करण्याचे काम आम्ही करत आहोत. वर्ष २०१९ मध्येच हे युतीचे सरकार यायला हवे होते.

प्रलंबित मागण्यांसाठी राजपत्रित अधिकारी महासंघाची पुन्हा लक्षवेध आंदोलनाची चेतावणी !

महासंघाच्या वतीने २७ ऑक्टोबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.

आतंकवादाच्या विरोधात सर्वांनी एकत्रित लढणे आवश्यक ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

२६/११ या दिवशी मुंबईवर झालेले आतंकवादी आक्रमण कुणीही विसरू शकत नाही. हा आमच्यासाठी ‘काळा दिवस’ होता. याच ठिकाणी आतंकवादाच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद होत आहे. आतंकवादाच्या विरोधात सर्वांनी एकत्र लढणे आवश्यक आहे. देशाचे पंतप्रधान त्यासाठी सक्षम आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह नोव्हेंबर मासात अयोध्येला जाणार

एकनाथ शिंदे हे नोव्हेंबर मासात अयोध्या येथे जाऊन प्रभु श्रीरामांचे दर्शन घेणार आहेत. या वेळी त्यांच्या पक्षाचे सर्व आमदारही त्यांच्यासमवेत असणार आहेत.

दिवाळीनिमित्त अराजपत्रित शासकीय कर्मचार्‍यांना १२ सहस्र ५०० रुपये अग्रीम !

अराजपत्रित शासकीय कर्मचार्‍यांना उत्सव अग्रीम (आगाऊ रक्कम) म्हणून बिनव्याजी १२ सहस्र ५०० रुपये देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांप्रमाणेच गट ‘क’ आणि गट ‘ब’ या अराजपत्रित संवर्गातील कर्मचार्‍यांनाही उत्सव अग्रीम मिळणार आहे.