मुंबई – अंधेरीच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ११ ऑक्टोबर या दिवशी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ हे चिन्ह दिले आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला ‘पेटती मशाल’ हे चिन्ह दिले आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्य-बाण’ हे चिन्ह गोठवल्यामुळे आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या गटाने देहली उच्च न्यायालयात याचिका केली आहे. निवडणूक आयोगाने यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ ही नावे दिली आहेत. त्यामुळे अंधेरीची पोटनिवडणुकीत ‘मशाल’ आणि ‘ढाल-तलवार’ यामध्ये चुरशीची लढत होणार आहे.