मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांच्या भाषणाच्या वेळी विदर्भवाद्यांकडून गोंधळ !

मराठी भाषेच्या संदर्भातील संमेलनात वेगळ्या विदर्भाची मागणी केली जाणे दुर्दैवी !

गुवाहाटी बंडाच्‍या वेळी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी दूरभाषवरून आशीर्वाद दिला होता !

गुवाहाटी बंडाच्‍या वेळी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी आम्‍हाला आशीर्वाद दिला होता, असा गौप्‍यस्‍फोट मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २ फेब्रुवारी या दिवशी येथे केला.

अर्थसंकल्पाविषयीचे विशेष अभिप्राय

समाजातील सर्व घटकांचा विचार करणारा अर्थसंकल्प ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधीमंडळाच्‍या मध्‍यवर्ती सभागृहात स्‍थापन !

गळ्‍यात रुद्राक्षांची माळ आणि खांद्यावर भगवी शाल असलेले बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र हे चित्रकार किशोर मानावडेकर यांनी साकारलेले आहे.

देहलीपासून मुंबईपर्यंत समन्‍वय असलेली व्‍यवस्‍था आणा ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

शहरांच्‍या विकासासाठी सामर्थ्‍य आणि इच्‍छाशक्‍ती यांची कोणतीही न्‍यूनता केंद्रशासनामध्‍ये नाही; परंतु मुंबईसारख्‍या शहरामध्‍ये महानगरपालिकेसारख्‍या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था विकासासाठी सहकार्य करत नाहीत, तोपर्यंत विकास गतीने होऊ शकत नाही.

दावोस (स्‍वित्‍झर्लंड) येथील ‘सामंजस्‍य करारां’मुळे महाराष्‍ट्रात विविध क्षेत्रांत गुंतवणूक !

जागतिक आर्थिक परिषदेच्‍या निमित्ताने येथे महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीत उद्योगांसमवेत विविध ‘सामंजस्‍य करार’ करण्‍यात आले. मुख्‍यमंत्र्यांचे दावोस येथे आगमन झाल्‍यानंतर त्‍यांच्‍या हस्‍ते ‘महाराष्‍ट्र पॅव्‍हेलियन’चे उद़्‍घाटन करण्‍यात आले.

सिन्‍नर-शिर्डी महामार्गावरील अपघातात १० जण ठार !

सिन्‍नर-शिर्डी महामार्गावर १३ जानेवारीच्‍या पहाटे ५ वाजता पाथरे येथे  मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खासगी आराम बस आणि शिर्डीकडून सिन्‍नर बाजूकडे जाणारा माल ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्‍या भीषण अपघात १० प्रवासी ठार, तर २५-३० प्रवासी घायाळ झाले आहेत.

शिवसेनेच्या आमदारांच्या पात्र-अपात्रतेविषयीची सुनावणी १४ फेब्रुवारीला !

शिवसेनेतून बाहेर पडून भाजपला पाठिंबा देणार्‍या आमदारांतील १६ जणांना अपात्र ठरवावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी १४ फेब्रुवारी या दिवशी होणार आहे.

(म्‍हणे) ‘लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी यांचे नाव अन् छायाचित्र माध्‍यमांमध्‍ये देऊ नका !’ – अधिकारी महासंघाची मुख्‍यमंत्र्यांकडे मागणी

अधिकारी महासंघाने अशी मागणी करून लाचखोरांची पाठराखण करण्‍यापेक्षा ‘प्रामाणिकपणे कामे करून स्‍वतःतील भ्रष्‍टाचारी वृत्ती नष्‍ट करण्‍यासाठी प्रयत्न करावेत’ !

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी पाठपुरावा करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

जी भाषा सर्वांना जोडते, सर्वांना सामावून घेते आणि जात, धर्म, पंथ पलीकडची माणुसकी शिकवते तीच खर्‍या अर्थाने विश्वाची भाषा होते. हे सर्व गुण आपल्या मराठी भाषेमध्ये अगदी ठासून भरले आहेत.