‘पंतप्रधान श्री’ योजनेतून विद्यार्थ्‍यांना आनंददायी शिक्षण मिळणार, महाराष्‍ट्रातील ८४६ शाळांची निवड !

शाळेतून गळती झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारसमवेत सामंजस्य करार केला आहे.

मुंबईला आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे शहर बनवणार ! – मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईत मेट्रो, ट्रान्‍सहार्बर लिंक, रस्‍ते या पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्‍यात येत आहे. मार्च २०२४ पर्यंत मुंबईतील रस्‍ते सिमेंट-क्राँकीटचे करण्‍याचे उद्दिष्‍ट ठेवले असून यासाठी ६५०० कोटी रुपयांचा निधी संमत केला आहे.

जात, धर्म यांच्‍या पलीकडे जाऊन देव, देश, गुरु, माता, पिता आणि समाज यांसाठी कार्य करा ! – अण्‍णासाहेब मोरे, अखिल भारतीय श्री स्‍वामी समर्थ गुरुपीठाचे प्रमुख

जाती आणि धर्म यांच्‍या पलीकडे जाऊन देव, देश, गुरु, माता, पिता आणि समाज यांसाठी निःस्‍वार्थीपणे कार्य केल्‍यास प्रत्‍येक घराघरात श्रावणबाळ आणि भक्‍त पुंडलिक सिद्ध होतील. सुखी आणि आरोग्‍यदायी जीवन जगायचे असेल तर न्‍यूनतम अपेक्षा, गरजा ठेवाल तर समाधानाने जीवन जगू शकाल….

‘वंदे भारत’ रेल्‍वे महाराष्‍ट्र आणि मुंबई यांसाठी यशस्‍वी पाऊल ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

महाराष्‍ट्रात रेल्‍वेचे सर्वांत मोठे जाळे आहे. मागील काही वर्षे रेल्‍वे विभाग दुर्लक्षित होता; मात्र पंतप्रधान मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्रशासनाने रेल्‍वेसाठी सर्वाधिक निधी दिला आहे.

ज्‍येष्‍ठ निरूपणकार आप्‍पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्‍ट्र भूषण’ पुरस्‍कार घोषित !

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेवदंडा येथील त्‍यांच्‍या निवासस्‍थानी जाऊन याविषयी त्‍यांची भेट देऊन सन्‍मान केला.

मराठी भाषा विकास प्राधिकरण स्‍थापण्‍याचा कायदा करा !

६ वर्षांपूर्वी सिद्ध केलेल्‍या मराठी भाषा धोरणाचा अवलंब करण्‍यातील अडचणी सरकारने सोडवाव्‍यात, ही अपेक्षा !

रत्नागिरी : लाल आणि निळ्या पूररेषेवर ८ दिवसांत बैठक घेऊन ठोस निर्णय घेऊ ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

या रेषांमुळे चिपळूणचा मोठा नागरी वस्तीचा भाग बाधित झाल्याने या रेषा रहित करण्याची मागणी केली जात आहे.

हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या उपस्‍थितीत मलंगगडावर उत्‍सव साजरा !

मलंगगडावरील हिंदूंंची वहिवाट आणि तेथील धार्मिक परंपरा जपण्‍यासाठी शिवसेनेचे दिवंगत जिल्‍हाप्रमुख आनंद दिघे यांनी वर्ष १९८० पासून येथे माघी पौर्णिमेनिमित्त उत्‍सवाला आरंभ केला.

आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीच्या दर्शनाला भाविकांचा महासागर

श्री भराडीदेवीचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवीची ओटी भरली. या वेळी त्यांनी ‘महाराष्ट्रातील जनता, शेतकरी यांना सुखी ठेव’, असे साकडे श्री भराडीमातेच्या चरणी घातले.

मराठी भाषेच्‍या समृद्धीसाठी राज्‍य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करील ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

मराठी साहित्‍यकांनी मराठी माणसांचे मन समृद्ध केले. या सर्व प्रतिभावंतांचे मराठी माणसांवरील ऋण न फिटणारे आहे. साहित्‍य हा समाजाचा आरसा असतो. मातीचा गंध साहित्‍यिकांच्‍या लेखनातून दरवळत असतो. हा वारसा पुढे चालत राहिला पाहिजे.