शिवसैनिकांच्‍या मेळाव्‍यासाठी १४ जुलैला मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे कोल्‍हापूर दौर्‍यावर ! – राजेश क्षीरसागर

एका मासात मुख्‍यमंत्र्यांचा दुसरा दौरा असल्‍याने शिवसैनिकांमध्‍ये उत्‍साहाचे वातावरण आहे, अशी माहिती राज्‍य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्‍यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. या मेळाव्‍याच्‍या नियोजनासाठी १२ जुलैला सकाळी ११ वाजता दसरा चौक येथील राजर्षी शाहू स्‍मारक भवन येथे पदाधिकार्‍यांच्‍या मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे.

घराणेशाही पक्षांमध्‍ये लोकशाही बहाल करणे आवश्‍यक !

‘अजित पवारांच्‍या बंडखोरीनंतर राष्‍ट्र्रवादी काँग्रेसमध्‍येही शिवसेनेप्रमाणे मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे त्‍या वेळच्‍या शिवसेनेतून केवळ बाहेर पडले नाहीत, तर नंतर ते महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्रीही झाले. शिवसेनेला पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्‍ह गमवावे लागले. त्‍

अंधेरी (मुंबई) येथे श्रीराम मंदिराजवळील भूमी कब्रस्थानासाठी देण्याची शिवसेनेच्या नेत्यांची मागणी !

श्रीरामाच्या मंदिराजवळ कब्रस्तानाची मागणी हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्‍या सरकारमधील नेत्याने करणे हे दुर्दैवी आहे. श्रीरामाच्या मंदिराजवळ कब्रस्तानासाठी जागा दिल्यास विरोध करू, अशी भूमिका सकल हिंदु समाजाकडून करण्यात आली आहे.

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्‍ट कालावधीत होणार !

७ जुलै या दिवशी विधीमंडळाच्‍या कामकाज सल्लागार समित्‍यांची बैठक झाली. या वेळी विधानसभेचे अध्‍यक्ष अधिवक्‍ता राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्‍या उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे यांनी ही घोषणा केली.

राज ठाकरे यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली !

या भेटीविषयी अद्याप एकनाथ शिंदे किंवा राज ठाकरे यांच्‍याकडून अधिकृतपणे वाच्‍यता करण्‍यात आलेली नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्‍यास शिवसेनेला अडचण येऊ शकते, अशी चर्चा आहे.

अजित पवार मुख्‍यमंत्री होणार असल्‍याच्‍या अफवा यशस्‍वी होणार नाहीत ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

जितदादा सरकारमध्‍ये सहभागी झाल्‍यानंतर ते मुख्‍यमंत्री होणार आहेत, असे कोण पिकवत आहे, त्‍यांचे मनसुबे यशस्‍वी होणार नाहीत, असे मत राज्‍याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ६ जुलै या दिवशी पत्रकार परिषदेत केले.

वर्ष २०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्‍यमंत्री ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्‍यक्ष, भाजप

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे हेच वर्ष २०२४ पर्यंत मुख्‍यमंत्री रहाणार आहेत, असे स्‍पष्‍ट प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे ६ जुलै या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केले. ‘उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी केलेल्‍या विधानावर विश्‍वास ठेवला पाहिजे.

मी त्यागपत्र देणार ही अफवा ! – मुख्यमंत्री

मी त्यागपत्र देणार आहे, ही अफवा आहे. विरोधकांकडून ती पसरवली जात आहे. सर्वसामान्य घरातील माणूस मुख्यमंत्री झाला, ही विरोधकांची पोटदुखी आहे. सरकारच्या शपथविधीपासून ते ‘सरकार पडेल’ असे म्हणत आहेत.

‘हरित हायड्रोजन’चेे धोरण घोषित करणारे महाराष्‍ट्र देशातील पहिले राज्‍य, मंत्रीमंडळाची मान्‍यता !

४ जुलै या दिवशी झालेल्‍या राज्‍य मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत या प्रकल्‍पाला मान्‍यता देण्‍यात आली असून त्‍यासाठी ८ सहस्र ५६२ कोटी रुपये इतका निधी संमत करण्‍यात आला आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाची सर्वाेच्च न्यायालयात याचिका !

१७ जुलै या दिवशी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन चालू होणार आहे. त्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष हा निर्णय येतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.