आर्थिक अपहाराचे आरोप पुराव्यानिशी सिद्ध करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करीन ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

आर्थिक घोटाळ्यामध्ये माझ्या कुटुंबियांचे नाव विनाकारण गोवण्यात आले आहे. मी आव्हान देतो की, पुराव्यानिशी ते सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सिद्ध रहा, अशी चेतावणी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘ट्वीट’द्वारे दिली आहे.

सौ. वर्षा राऊत यांना अन्वेषणासाठी उपस्थित रहाण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाची दुसरी नोटीस

हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि ‘पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक यांतील यांमधील आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी खासदार संजय राऊत यांच्या पत्नी सौ. वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून दुसरी नोटीस पाठवण्यात आली आहे.

संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्याकडे कोट्यवधी रुपये कुठून आले ? याचे अन्वेषण व्हायला हवे ! – किरीट सोमय्या, भाजप

अंमलबजावणी संचालनालयाने सौ. वर्षा राऊत यांना बँके’तील आर्थिक अपहाराप्रकरणी चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्यांनी हे वक्तव्य केले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ‘नेट कॅफे’ चालकांकडून सर्रास लूट

उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेतील संगणकीय कामासाठी अधिक पैसे आकारत ‘नेट कॅफे’ चालकांनी लूट चालवली आहे.

माजी कृषीमंत्री शरद पवारांच्या मनातले मोदींनी करून दाखवले ! – देवेंद्र फडणवीस, भाजप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा कृषी कायद्याला समर्थन दिले मात्र काहींची राजकीय दुकानदारी बंद होईल म्हणून याला विरोध करण्यात आला.

कॉलसेंटरमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली शेकडो युवकांची फसवणूक

कॉलसेंटरमध्ये नोकरी आहे, अशी जाहिरात देऊन शेकडो युवकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाणे येथे कैलास भारत कसबे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाराचा राजकारणासाठी उपयोग महाराष्ट्रात पाहिलेला नाही ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

भाजपच्या विरोधात बोलणार्‍यांच्या मागे अंमलबजावणी संचालनालयाची चौकशी लावली जाते.=अनिल देशमुख

मुंबईतील अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असा फलक लावला

सौ. वर्षा राऊत यांना समन्स आल्यावर शिवसैनिकांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयावर ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असा फलक लावला.

 राज्य परिवहन मंडळाला मिळणार्‍या कर्जाचा प्रस्ताव स्थगित ?

बँकेकडून कर्जासाठी राज्य सरकारकडून हमी मिळत नसल्याने प्रस्ताव रखडला

खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्स

४ वर्षांपूर्वी ‘पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र बँके’मध्ये ३५० कोटी रुपयांचा अपहार झाला होता. यामध्ये काही रक्कम सौ. वर्षा राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय यांच्या खात्यात जमा झाल्याविषयी चौकशी करण्यासाठी त्यांना समन्स पाठवण्यात आला आहे.