अमेरिकेमध्ये आता गांजाचा वापर केल्यास कारवाई होणार नाही !

गांजाच्या प्रकरणी कारागृहातील सर्वांची होणार सुटका !

गोवा : अमली पदार्थ तस्कराकडून लाच घेणारे २ पोलीस निलंबित

गोव्यातील अमली पदार्थांचा व्यवसाय कारवाईनंतरही आटोक्यात का येत नाही ? हे पुन्हा एकदा उघड झाले ! कुंपणच शेत खात असेल, तर गोव्याला लागलेला ‘अमली पदार्थांचे ठिकाण’ हा ठपका कधीतरी पुसला जाईल का ?

मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे कोकेन जप्त !

येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर २८ सप्टेंबर या दिवशी मुंबई सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांनी ५ कोटी रुपयांचे ४९० ग्रॅम कोकेन जप्त केले.

केंद्रीय अन्वेषण यंत्रणांच्या कारवाईत देशभरातून १७७ अमली पदार्थ माफियांना अटक

केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), अमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि इंटरपोल यांनी ८ राज्यांतील पोलिसांच्या साहाय्याने ‘ऑपरेशन गरुड’ नावाने कारवाई करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोव्यात आणले जाणारे ‘ब्लॅक कोकेन’ जप्त

अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून (एन्.सी.बी.) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बोलिव्हियाच्या एका महिलेकडून १५ कोटी रुपये किमतीचे ३.२ किलोग्रॅम वजनाचे ‘ब्लॅक कोकेन’ जप्त करण्यात आले. हे अमली पदार्थ गोव्यात आणले जाणार होते, असे अन्वेषणातून आढळून आले आहे.

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात उत्कृष्ट प्रतीचा गांजा आणि चरस उपलब्ध होत असल्याची बंदीवानाची माहिती

प्रसिद्धीमाध्यमे आणि इतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमली पदार्थ विक्रीच्या जाळ्यासंबंधी अन्वेषण करण्यासाठी पोलिसांना कारागृहातील अधिकारी सहकार्य करत नसल्याचे समजते.

भोगवादी संस्कृती नको !

पुण्यात सध्या पबची विकृती वाढत आहे. पब, नाईट क्लब यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरकृत्ये, तसेच अनेक अवैध धंदे चालतात. महाविद्यालयीन विद्यार्थी हेच देशाचे भवितव्य आणि तेच भावी पिढीचे आदर्श असणार आहेत. त्यांना नशेच्या जाळ्यात ओढण्याचा प्रकार जाणूनबुजून होत आहे का ?

अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घाला !

मुळात अशी मागणी करावी लागणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद नव्हे का ? उघडपणे अमली पदार्थांची विक्री होते, यावरून गुन्हेगारांना पोलिसांचे भय राहिले नसल्याचे स्पष्ट होत आहे !

आसाममधील भारत-बांगलादेश सीमेवरून १० लाख रुपयांच्या मादक पदार्थांच्या गोळ्या जप्त

आसाम रायफल्स आणि सीमा सुरक्षा दल यांनी संयुक्तरित्या ही कारवाईत केली.

अमली पदार्थांचे उत्पादक, व्यावसायिक आणि ग्राहक मिळून अंदाजे दीड सहस्र लोक या व्यवहारात सहभागी ! – भाग्यनगर पोलीस

भाग्यनगर पोलीस अमली पदार्थ व्यवसायाची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सक्रीय झाल्याने गोव्यातील अमली पदार्थ व्यावसायिकांचे धाबे धणाणले आहेत.