मुंबई – येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर २८ सप्टेंबर या दिवशी मुंबई सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्यांनी ५ कोटी रुपयांचे ४९० ग्रॅम कोकेन जप्त केले. कोकेनची वाहतूक करणार्या वांबुई काने वंजिरू या केनिया देशाचे नागरिकत्व असलेल्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
एका आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीने तिला हे पाकीट मुंबईमध्ये पोचवण्यासाठी दिले होते. मुंबईमध्ये हे पाकीट कुणाला द्यायचे ? याविषयी महिलेला ठाऊक नव्हते. मुंबईमध्ये आल्यावर येथील हस्तक तिच्याशी संपर्क साधून कोकेनचे पाकीट घेणार होते. अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार या महिलेवर कायदेशीर कारवाई करण्यात येत असून सीमाशुल्क विभागाचे अधिकारी या प्रकरणी अधिक अन्वेषण करत आहेत.