केंद्रीय अन्वेषण यंत्रणांच्या कारवाईत देशभरातून १७७ अमली पदार्थ माफियांना अटक

अनेक किलो अमली पदार्थ जप्त

प्रतीकात्मक छायाचित्र

नवी देहली – केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), अमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि इंटरपोल यांनी ८ राज्यांतील पोलिसांच्या साहाय्याने ‘ऑपरेशन गरुड’ नावाने कारवाई करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले. यासह १७७ जणांना अटक केली. या कारवाईचा उद्देश अमली पदार्थ माफियांचे विदेशांशी असणारे जाळे तोडणे, हा होता. हिमाचल प्रदेश, पंजाब, देहली, मणीपूर, गुजरात, महाराष्ट्र, तमिळनाड आदी राज्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली. यात एकूण ६ सहस्र ६०० जणांना कह्यात घेण्यात आले होते.

यातून ५ किलो १२५ ग्राम हेरॉईन, ३ किलो २९ ग्राम चरस, १ किलो ३६५ ग्राम मेफेड्रोन, आदी अमली पदार्थ जप्त करण्यात आले.