अमेरिकेतून टपालाद्वारे गांजा मागवणार्‍या दोघांना अटक !

१० लाख रुपयांहून अधिक मूल्य असणारा गांजा जप्त

छत्रपती संभाजीनगर येथून ५०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त !

येथील महसूल गुप्तचर संचालनालयाने (‘डी.आर्.आय.’ विभागाने) छत्रपती संभाजीनगर येथून ५०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना ललित पाटील याची चौकशी का केली नाही ? – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला १० नोव्हेंबर २०२० या दिवशी अटक करण्यात आली होती. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी ललित पाटील याला नाशिकचे जिल्हाप्रमुख केले होते.

ललित पाटीलच्या मैत्रिणींना ४ दिवसांची पोलीस कोठडी !

ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर या दोघी ललित पाटीलच्या संपर्कात होत्या, तसेच त्याला पळून जाण्यासाठी या दोघींनीच साहाय्य केल्याचे लक्षात आले आहे.

अमली पदार्थांचा विळखा !

प्रारंभी जिज्ञासेपोटी अमली पदार्थांची चव चाखणारे महाविद्यालयीन विद्यार्थीच नव्हे, तर उच्चभ्रू वर्गातील लोकही यात गुरफटू लागले आहेत. त्यामुळे येणार्‍या भावी पिढ्यांना जर या अमली पदार्थांपासून वाचवायचे असेल, तर कठोर कारवाई करून अमली पदार्थांचे जाळे आणि त्यांमागील सूत्रधार यांना उद्ध्वस्तच करावे लागेल !

अमली पदार्थाचा तस्कर ललित पाटील याला चेन्नई येथून अटक !

ललित पाटील याची अवैध अमली पदार्थ बनवण्याची उलाढाल ३०० कोटी रुपये आहे. त्याचे जाळे देशभरात पसरले आहेत. त्यामुळे त्याला पकडणे पोलिसांना कठीण गेले.

ललितला ‘मेफेड्रोन’ सिद्ध करण्याचा कच्चा माल पुरवणार्‍या २ जणांना अटक 

अमली पदार्थाची विक्री करणारा ललित पाटील हा स्वत: ‘मेफेड्रोन’ सिद्ध करत होता. त्याकरता लागणार्‍या कच्च्या मालाचा पुरवठा करणार्‍या ६ जणांची नावे पोलिसांना समजली आहेत; त्यांपैकी २ जणांना अटक करण्यात आली, तर ४ जणांचा शोध चालू आहे.

गोवा : अमली पदार्थ प्रकरणी नायजेरियाच्या नागरिकाला सशर्त जामीन संमत

अमली पदार्थांची प्रकरणे वाढत असतांना असा हलगर्जीपणा अपेक्षित नाही. अशाने अमली पदार्थ व्यावसायिकांना दिलासाच मिळणार ! रासायनिक अहवालाला होणार्‍या विलंबाची समस्या तात्काळ सोडवणे आवश्यक आहे !

गोव्यासह इतर राज्यांत १३५ कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ आणण्याचा डाव फसला !

अमली पदार्थ तस्करी हा राष्ट्रविरोधी गुन्हा ठरवून त्याप्रमाणे त्यातील दोषींना शिक्षा होणे आवश्यक आहे; कारण शत्रूराष्ट्र पाकिस्तान आणि चीन हे अमली पदार्थांद्वारे देशाची युवा पिढी नष्ट करण्याचे षड्यंत्र रचत आहेत !

जुन्नर, शिरूर तालुक्यांमध्ये (पुणे) २०० किलो ‘अल्प्राझोलम’चा साठा जप्त !

या ‘अल्प्राझोलम’चा वापर मनोविकारांसाठी लागणार्‍या औषधांसाठी केला जातो; परंतु याचा वापर अमली पदार्थ सिद्ध करण्यासाठी केला जात असावा असा संशय एन्.सी.बी.तील अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.