‘माझ्या मुलाचा ‘एन्काऊंटर’ करा’, असा पुढार्‍यांचा पोलिसांना आदेश असल्याचा ललित पाटील याच्या आईचा आरोप !

टीव्हीला दाखवल्यापासून आम्हाला धक्काच बसला आहे. मुलाने असे केले, ते चुकीचे आहे. या गोष्टीची मला कल्पना नव्हती, अशी प्रतिक्रिया ललित पाटील यांच्या आईने ‘टीव्ही-९’ या वाहिनीशी बोलतांना दिली आहे.

ललित पाटील तुमच्‍या कह्यात असतांना तुम्‍हाला नीट सांभाळता आले नाही !

अमली पदार्थ तस्‍कर ललित पाटील ससून रुग्‍णालयातून पळून जाण्‍याच्‍या घटनेला १० दिवसांचा अवधी झाला असून पुणे पोलिसांनी आरोपी ललित पाटील याचे भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना उत्तरप्रदेश येथून कह्यात घेतले

मणीपूर येथील म्यानमार सीमेवर सरकार १०० किमी लांबीचे कुंपण घालणार

कुंपण घातल्याने म्यानमारमधून होणारी आतंकवाद्यांची घुसखोरी थांबेलच, असे म्हणता येणार नाही. त्यासाठी सर्तकतही रहावे लागणार !

गोवा : ३ अल्पवयीन मुलांनी त्यांच्या अल्पवयीन मित्राला १८ वेळा ‘बॅट’ने शरिरावर प्रहार करून केले घायाळ !

अमली पदार्थांच्या व्यसनाचा अल्पवयीन मुलांवर गंभीर परिणाम ! आतातरी पोलीस आणि प्रशासन यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन राज्यातील भावी पिढीला वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत !

डिचोली (गोवा) येथे अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांची कारवाई : १० जण कह्यात

‘अशी कारवाई काही काळापुरती मर्यादित न रहाता ती कायमस्वरूपी व्हावी आणि अमली पदार्थांचे केवळ डिचोलीतूनच नव्हे, तर संपूर्ण गोव्यातून उच्चाटन करावे’, अशा प्रतिक्रिया जागरूक नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या ललित पाटील याच्या घरावर धाड !

‘ससून सर्वोपचार रुग्णालया’मध्ये वैद्यकीय उपचार घेत असतांना ललित पाटील हा अमली पदार्थांची विक्री करत होता. सध्या तो पसार झाला आहे. पोलिसांनी त्याच्यासह ३ आरोपींच्या नाशिक येथील घरांवर धाडी टाकल्या.

नाशिक येथे ३०० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्‍त !

मुंबई पोलिसांनी शिंदे गावात धाड टाकून एम्.डी. हा अमली पदार्थ तयार करणार्‍या कारखान्‍यातून ३०० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला.

अमली पदार्थ तस्‍करीप्रकरणी पोलीस हवालदार अटकेत !

पोलिसांनी तस्‍करी करणे म्‍हणजे ‘कुंपणानेच शेत खाण्‍याचा’ प्रकार !

अनधिकृतपणे वास्‍तव्‍य करणार्‍या १४ जणांना भारत सोडण्‍याची नोटीस

पोलिसांनी अमली पदार्थ बाळगणार्‍यांच्‍या विरुद्धच्‍या मोहिमेमध्‍ये उलवे येथे रहाणार्‍या नायजेरियन नागरिकांवर कारवाई केली आहे. यामध्‍ये अवैधरित्‍या वास्‍तव्‍य करणार्‍या १४ जणांना भारत सोडण्‍याची नोटीस बजावली आहे.

नायजेरियन नागरिकाकडून अडीच लक्ष रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात

गोव्यात अमली पदार्थ व्यवसायाप्रकरणी बहुतांश नायजेरिन नागरिकांना पकडण्यात येते. राज्यातील नायजेरियन नागरिकांच्या कृतींवर पोलिसांनी करडी दृष्टी ठेवणे आवश्यक असल्याचे दिसून येते !