ललितला ‘मेफेड्रोन’ सिद्ध करण्याचा कच्चा माल पुरवणार्‍या २ जणांना अटक 

पुणे येथील ललित पाटील पलायन प्रकरण ! 

(‘मेफेड्रोन’ हा एक अमली पदार्थ आहे.)

पुणे – अमली पदार्थाची विक्री करणारा ललित पाटील हा स्वत: ‘मेफेड्रोन’ सिद्ध करत होता. त्याकरता लागणार्‍या कच्च्या मालाचा पुरवठा करणार्‍या ६ जणांची नावे पोलिसांना समजली आहेत; त्यांपैकी २ जणांना अटक करण्यात आली, तर ४ जणांचा शोध चालू आहे. या सर्व प्रकरणांचा मुख्य सूत्रधार ललित पाटील हाच असून त्याचा शोध चालू आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयामध्ये दिली. नाशिक येथील औद्योगिक वसाहतीमध्ये ‘मेफेड्रोन’ सिद्ध करण्याचा समाधान कांबळे याच्या मालकीचा कारखाना आहे. शिवाजी शिंदे हा त्याला कच्चा माल पुरवत होता. हरिश पंत, जिशान शेख आणि राहुल पंडित हे ‘मेफेड्रॉन’ सिद्ध करत होते. सिद्ध केलेले ‘मेफेड्रॉन’ इम्रान शेख आणि गोलू हे विकत होते. यांतील जिशान शेख आणि शिवाजी शिंदे यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ललितचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांच्या पोलीस कोठडीमध्ये २० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

अमली पदार्थांचे देशांतर्गत जाळे पोलिसांनी उद्ध्वस्त करावे !