पालघर येथील साधूंच्या हत्याकांडाचे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे देणार !

पालघर येथील साधूंचे हत्या प्रकरण

मुंबई – पालघर येथील साधूंच्या हत्याकांडाचे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (‘सीबीआय’कडे) देण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. गडचिंचले (पालघर) या गावात २ वर्षांपूर्वी जमावाने २ साधूंची ठेचून हत्या केली होती. राज्याचा गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) याचे अन्वेषण करत होता. हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी भाजपने केली होती. त्यानुसार नव्या शासनाने वरील निर्णय दिला.

आधीच्या सरकारला जमले नाही, ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले ! – आचार्य तुषार भोसले, आध्यात्मिक आघाडी प्रमुख, भाजप

जे आधीच्या सरकारला जमले नाही, ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले. या निर्णयामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या धर्माप्रती किती जागरूक आहेत, हे हिंदूंना समजले.